Nashik News : शहरातील वाढत्या अतिक्रमणासंदर्भात आमदार देवयानी फरांदे यांनी विधीमंडळात लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर खडबडून जागी झालेल्या महापालिका यंत्रणेने सोमवारी (ता.१) कॉलेज रोड भागात अतिक्रमणावर होतोडा मारला. यासह शहरातील दोन हजार ७९१ अतिक्रमण धारकांना महापालिकेकडून नोटिसा देण्यात आल्या आहे. (Nashik Encroachment)
शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. सर्वसामान्य नागरिकांनी तक्रारीत करूनही त्याची दखल घेतली जात नाही. कॉलेज रोड, गंगापूर रोड, शरणपूर रोड या भागामध्ये टेरेसवर हॉटेलची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर सामाईक अंतरामध्ये देखील हॉटेल सुरू झाली आहेत. मुंबई पुण्यासारखी नाशिकची स्थिती होत असताना देखील अतिक्रमण विभागाकडून कारवाई होत नसल्याने आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी विधी मंडळात लक्षवेधी सूचना मांडली.
त्याअनुषंगाने राज्याच्या नगर विकास विभागाचे कार्यासीन अधिकारी मो. क. बागवान यांनी महापालिकेला पत्र पाठवून अतिक्रमण कारवाई संदर्भात लेखी मागितले व मंत्रालयात हजर राहण्याच्या सूचना दिल्या.शहरात रस्त्याच्या बाजूला असलेली अतिक्रमणे व व्यावसायिकांना दिलेल्या नोटीस त्याचप्रमाणे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना मागील सामान्य किती नोटिसा दिल्या. यासंदर्भात माहिती मागविण्यात आली आहे.
नोटीस दिल्यानंतर किती जणांवर कारवाई करण्यात आली. प्रलंबित प्रकरणे किती? लोकप्रतिनिधींनी नोटीस ची मागणी केल्यानंतर त्याची प्रत दिली का नाही? व शहरातील गर्दीचे ठिकाणी व त्या ठिकाणी होत असलेल्या कारवाईची माहिती मंत्रालयातून मागविण्यात आली आहे. लक्षवेधीच्या अनुषंगाने अतिक्रमण विभागाने आजपासून कारवाईला सुरवात केली कॉलेज रोड भागातील टेरेस वरील हॉटेल पाडण्यात आले. (latest marathi news)
"संपूर्ण शहरांमध्येच मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही अतिक्रमणे हटविले जात नसल्याने लक्षवेधी माध्यमातून माहिती मागवावी लागली." - प्रा. देवयानी फरांदे, आमदार.
विभागनिहाय अतिक्रमण नोटिसा
पूर्व विभागात ४८३, पंचवटी २७३, सिडको एक हजार ६१२, नाशिक रोड २९८, पश्चिम विभाग १२५ असे एकूण दोन हजार ७९१ अतिक्रमण धारकांना नोटिसा पाठविण्यात आल्या असून मुंबई नाका येथे माजी आमदार वसंत गिते यांच्या कार्यालयावरील कारवाईचा अहवालही पाठविण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.