Nashik Onion Auction : पुन्हा सुट्टयांमुळे लिलाव बंदच! शेतकरी वैतागले

Onion Auction : बाजार समिती व उपबाजारातील सातत्याच्या सुट्यांमुळे लिलाव बंद राहत असल्याने शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे.
Onion Auction
Onion Auctionesakal
Updated on

Nashik Onion Auction : बाजार समिती व उपबाजारातील सातत्याच्या सुट्यांमुळे लिलाव बंद राहत असल्याने शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. उन्हाळी कांदा व इतर माल विक्री करता येत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. मार्चएंडसह विविध सणांमुळे जिल्ह्यातील कांदा बाजार सलग पाच दिवस बंद होता. माथाडी कामगारांचे प्रश्‍न, शनिवार, रविवारची सुटी, अमावस्या, गुढीपाडवा आदींमुळे बाजार बंद राहणार आहे. (Nashik Again due to holidays farmers are upset that onion auction is closed )

तब्बल बारा दिवस लिलावाचे कामकाज बंद राहणार असून दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. मालेगावसह कसमादेत दुष्काळी परिस्थिती आहे. उपलब्ध पाण्यावर शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याचे पीक घेतले आहे. काही शेतकऱ्यांनी टरबूज, खरबूज यासह भाजीपाला लागवड केली आहे. बाजार समितीच्या मुख्य आवारात भाजीपाला, फळफळावळ, कडधान्य आदींचे लिलाव केले जातात.

मुंगसे, झोडगे व सौंदाणे उपबाजारात कांदा खरेदी विक्री केली जाते. केंद्र शासनाने मार्च एंडच्या व्यवहारांसाठी शनिवार, रविवारीदेखील बँका सुरु ठेवण्याचे आदेश दिले होते. असे असताना बाजार समित्यांमधील लिलाव सलग बारा दिवस बंद ठेवण्याचा प्रकार संतापजनक असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केल्या जात आहेत.

गुढीपाडवा तसेच कौटुंबिक खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात कांदा विक्री करावी लागत आहे. बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक अडचण होत आहे. बाजार समिती प्रशासनाने समन्वयातून बाजार घटकांना विश्‍वासात घेऊन सलग सुट्ट्यांचे प्रमाण कमी करून लिलाव पूर्ववत सुरु करावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. (latest marathi news)

Onion Auction
Nashik Onion Auction : नाशिक जिल्ह्यात उद्यापासून कांदा लिलाव बंद; जिल्हा व्यापारी असोसिएशनचा निर्णय

अशा सुट्या, अशी अडवणूक

मालेगाव बाजार समितीच्या मुंगसे, झोडगे, सौंदाणे कांदा खरेदी केंद्रासह विविध बाजार समित्यांमधील लिलाव शुक्रवारी (ता. २९) गुड फ्रायडे, शनिवारी (ता. ३०) रंगपंचमी, रविवारी (ता. ३१) नियमित सुट्टी तर सोमवारी (ता. १), मंगळवारी (ता. २) व बुधवारी (ता. ३) व्यापाऱ्यांच्या मार्च अखेरच्या व्यवहारामुळे बाजार बंद होता. ४ एप्रिलला बाजार पुर्ववत सुरु होईल असे सांगण्यात आले होते.

तथापि हिशोब पट्टीतून हमाली, तोलाई व वाराई कपातीसंदर्भात हमाल- मापारी यांच्याकडून पत्र आल्याने ४ व ५ एप्रिलला बाजार बंद राहणार आहे. ६ एप्रिलला शनिवार, तर ७ एप्रिलला रविवार आहे. ८ एप्रिलला अमावस्या तर ९ एप्रिलला गुढीपाडव्याची सुटी आहे. एकंदरीत २९ मार्च ते ९ एप्रिल असे सलग १२ दिवस लिलाव बंद राहणार आहेत.

''व्यापारी व हमाल-मापारी यांच्यातील प्रश्‍न लवकर सुटला पाहिजे. शनिवार, रविवारी तसेच अमावस्या व सणासुदीला बाजार बंद असतो. मार्च एंडच्या कालावधीतच सणासुदीचे दिवस आले. शक्य तेवढ्या लवकर बाजार सुरु करण्याचा प्रयत्न राहील.''- ॲड. विनोद चव्हाण, उपसभापती, बाजार समिती, मालेगाव

Onion Auction
Nashik Onion Auction: कांदा लिलाव सुरू करण्याच्या हालचाली! व्यापारी ठाम राहिल्याने बाजार समित्यांची भूमिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()