Nashik Agriculture : जिल्ह्यात मॉन्सूनचे आगमन झाले असून, खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. आतापर्यंत खरीप हंगामासाठी निश्चित केलेल्या सहा लाख ४१ हजार ७७१ हेक्टर क्षेत्रापैकी एक लाख ११ हजार ११५ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. पूर्व भागातील दुष्काळी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने या तालुक्यात सर्वाधिक पेरण्या झाल्या आहेत. पश्चिम भागातील तालुक्यात पुरेसा पाऊस नसल्याने तुलनेत येथे पेरण्यांचा वेग कमी आहे. ( Kharif has been sown on one lakh 11 thousand hectares in district )
यात यंदा शेतकऱ्यांनी मका, कापूस व सोयाबीनला पसंती दिली आहे. जिल्ह्यात मृग नक्षाच्या पावसाचे आगमन झाल्याने शेतीकामांना चांगलाच वेग आला आहे. शेतीची मशागत करून खरिपाच्या पेरण्यांची लगबग सर्वत्र सुरू आहे. गेल्या वर्षी सहा लाख २६ हजार १९० हेक्टरवर खरिपाची लागवड झाली होती. यंदा यात वाढ झाली असून, सहा लाख ४१ हजार ७७१ हेक्टर क्षेत्र खरिपासाठी निश्चित करण्यात आले आहे.
पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरवात केली आहे. एक लाख ११ हजार ११५ हेक्टर क्षेत्रावर (१६.८८ टक्के) पेरण्या झाल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे. यात सर्वाधिक मका पिकाची लागवड झाली आहे. मका पिकासाठी निश्चित केलेल्या दोन लाख १७ हजार १०८ हेक्टर क्षेत्रापैकी ६६ हजार ७५२ हेक्टरवर (३०.७५ टक्के) मका लागवड झाली आहे. यापाठोपाठ कपाशी आणि सोयाबीनची लागवड झाली.
कपाशीसाठी सर्वसाधारण ४६०४८.६१ हेक्टर क्षेत्र निश्चित आहे. यापैकी नऊ हजार ८८१ हेक्टरवर (२१.४६ टक्के) पेरणी झाली आहे. ७६ हजार २३५ सोयाबीन पिकासाठी निश्चित क्षेत्र असून, यापैकी आतापर्यंत नऊ हजार २१४ हेक्टर पेरा झाला आहे. ज्वारी (आठ टक्के), बाजरी (८.६१ टक्के), तूर (७.७५ टक्के), मूग (७३ टक्के), उडीद (०.६१ टक्के), भुईमूग (८.४७ टक्के) पेरण्या झाल्या आहेत. खरीप हंगामासाठी दोन लाख २० हजार टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. (latest marathi news)
यात यूरिया ७६ हजार ९०० टन, डीएपी १८ हजार ३०० टन, तर ‘एसएसपी’च्या २६ हजार ५०० टनांचा समावेश आहे. यापैकी जूनअखेर एक लाख ४७ हजार टन खतसाठा उपलब्ध होणे अपेक्षित होते. यातील ९४ हजार ५२३ टन खतसाठा प्राप्त झाला आहे. सद्यःस्थितीत गेल्या वर्षीचा शिल्लक एक लाख ८१ हजार ४२६ टन असा एकूण दोन लाख ७५ हजार ९४९ टन खतसाठा शिल्लक आहे. आतापर्यंत ४५ हजार २३१ टन खतांची विक्री झाली आहे.
तर ७१ हजार २४३ क्विंटल बियाण्यांची मागणी कृषी विभागाने केली होती. त्यापैकी आतापर्यंत ५६ हजार ३५० क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. यातील १९ हजार ३६५ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली आहे. यात कपाशीची ७५ हजार पाकिटे, भात आठ हजार २७६ क्विंटल, बाजरी एक हजार २५० क्विंटल, सोयाबीन पाच हजार ९५५ क्विंटल आणि मका चार हजार ७७३ क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे.
तालुकानिहाय झालेल्या पेरण्या (कंसात टक्क्यांमध्ये)
मालेगाव (६.५८), बागलाण (२.७२), कळवण (०.६१), देवळा (१७.६७), नांदगाव (६७.०५), सुरगाणा (०.१४), दिंडोरी (१.५२), इगतपुरी (०.१६), पेठ (०.२२), निफाड (१.३३), सिन्नर (४.३४), येवला (७४), तर नाशिक, त्र्यंबकेश्वर, चांदवड तालुक्यांत अद्याप पेरण्यांना सुरवात झालेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.