Nashik Agriculture News: सिन्नर तालुक्यात खरिपाचे 62 हजार 140 हेक्टरचे उद्दिष्ट! सोयाबीनचे क्षेत्र दुपटीने वाढण्याचा अंदाज

Nashik News : यंदा पावसाचा अंदाज चांगला असल्याने सोयाबीनचे क्षेत्र दुपटीने वाढण्याचा अंदाज आहे तर बाजरीत सरासरी क्षेत्राच्या ८० टक्के घट होण्याचा अंदाज आहे.
soybean Crop
soybean Cropesakal
Updated on

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : तालुका कृषी विभागामार्फत खरीप लागवडीची तयारी करण्यात येत आहे. तालुक्याच्या खरीप लागवड योग्य ६२ हजार १४० हेक्टरवर लागवडीचा अंदाज आहे. गतवर्षी १० जुलैपर्यंत केवळ ६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा पावसाचा अंदाज चांगला असल्याने सोयाबीनचे क्षेत्र दुपटीने वाढण्याचा अंदाज आहे तर बाजरीत सरासरी क्षेत्राच्या ८० टक्के घट होण्याचा अंदाज आहे. (62 thousand 140 hectares of Kharipa in Sinnar)

गतवर्षी ६२,८४० हेक्टरचा अंदाज होता. मात्र, सुरुवातीला पाऊस उशिरा आला. त्यानंतर १० जुलैपर्यंत जेमतेम पाऊस पडल्यामुळे खरीप हंगामात घट झाली. केवळ ३ हजार ९८३ हेक्टर इतकीच पेरणी झाली होती. पेरणी झालेल्या पिकांत केवळ मका व सोयाबीन याच क्षेत्राचा समावेश होता.

दोन वर्षापूर्वी सर्व १०० टक्के पेरणी झाली होती. यंदा सुरुवातीलाच पाऊस चांगला झाला तर खरीप लागवडीसाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह राहू शकेल. तालुक्यात सोयाबीनचे २१ हजार ६१७ हेक्टर इतके सरासरी क्षेत्र आहे. मात्र, यंदा ही लागवड ४५ हजार ४९० पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

पाऊस वेळेवर होण्याचा अंदाज असल्याने सोयाबीन लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल राहू शकेल. यंदा पाऊस झाल्यास दोन वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक क्षेत्र सोयाबीनच्या लागवडीखाली येणार आहे. बाजरीचे कमी प्रमाणात येणारे उत्पादन, तुलनेत सोयाबीन व मक्याची उत्पादकता जास्त असल्याने तालुक्यात पारंपारिक पीक बाजरी हद्दपारीच्या उंबरठ्यावर आहे.

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना बाजरी प्रकल्पासाठी बियाणे दिले जात असले तरी त्याची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कानाडोळा आहे. त्यामुळे २० हजार ६७० हेक्टर सरासरी क्षेत्र असूनही केवळ ४ हजार ३० हेक्टरवर बाजरी पिकाची पेरणी होण्याचा अंदाज शेतकऱ्यांसह अधिकाऱ्यांचा आहे. ही घट सरासरीच्या तब्बल ८० टके आहे. (latest marathi news)

soybean Crop
Nashik News : दिंडोरीत गतवर्षापेक्षा यंदा सोयाबीनने घेतली आघाडी! तालुक्यात 22706. 40 हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दीष्ट

मक्याचे सरासरी क्षेत्र ११ हजार २६६ इतके आहे. त्यावर ६ हजार ५१० हेक्टर इतकीच पेरणीची शक्यता आहे. मात्र, सिन्नर तालुक्यात भुईमुगाचे क्षेत्र २५६१ हेक्टर असले तरी ते ४ हजार १६० हेक्टरपर्यंत जाऊ शकेल. तूर, मूग, उडीद यात नेहमीप्रमाणेच घट अपेक्षित आहे.

"यंदा समाधानकारक पावसाळा असेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यानुसारच तालुक्यातील खरीप पेरणी उद्दिष्ट निश्चित केले आहे. शेतकऱ्यांनी घाई न करता जमिनीत पुरेशी ओल झाल्यावरच पेरणी करावी. सोयाबीनच्या बाबतीत शक्यतो घरातील बियाणे वापरावे. त्या अगोदर त्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी."- ज्ञानेश्वर नाठे, तालुका कृषी अधिकारी, सिन्नर

"दोन वर्ष पदरी निराशा पडल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे, तरीदेखील खरीप हंगामातील पिकांसाठी काही ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून ठेवली आहे. चालू वर्षीतरी वरुणराजा कृपा करेल या आशेवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली आहे. पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये. त्यांना नुकसानीच्या काळात मदत करावी."

- गोवर्धन रानडे, शेतकरी, सिन्नर

soybean Crop
Nashik: खरीपात हक्काच्या मका, कांद्यावरच येवलेकरांचा विश्वास! कपाशीसह कडधान्यात मोठी घट होणार; सलामीच्या पावसाने पेरणीची लगबग सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.