Nashik Agriculture News : मुरबाड-मृदू जमिनीवर फुलवली वांग्याची शेती; पाळे खुर्दच्या शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी

Nashik News : पिढ्यान् पिढ्या गायरानासाठी राखवून ठेवलेल्या मुरबाड-मृदू जमिनीवर पाळे खुर्द येथील शेतकऱ्याने ‘सुपर गौरव’ जातीच्या वांग्याची लागवड करुन मुरबाड जमिनीवर पिक घेतले.
Agriculture Cultivation of brinjal flourished on muddy soft soil
Agriculture Cultivation of brinjal flourished on muddy soft soil esakal
Updated on

Nashik News : पिढ्यान् पिढ्या गायरानासाठी राखवून ठेवलेल्या मुरबाड-मृदू जमिनीवर पाळे खुर्द येथील शेतकऱ्याने ‘सुपर गौरव’ जातीच्या वांग्याची लागवड करुन मुरबाड जमिनीवर पिक घेतले. हे पिक फुलविण्यात त्यांना यश आल्यामुळे परिसरातील अनेकजण शेती पाहण्यासाठी येत आहे. तालुक्यातील पाळे खुर्द येथील शेतकरी दिनेश (भावडू) पाटील यांच्या १ हेक्टर ४० गुंठे शेतीचा पोत पूर्णतः मृद व मुरबाड स्वरूपाचा आहे.

जमिनीत पाण्याचा निचरा त्वरित होऊन जाईल, याकरीता पिकाला सतत ओलावा राहावा, यासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी देऊन वांगी, भाजीपाला पिक चांगल्याप्रकारे काढता येतील, या विचाराने दिनेश पाटील यांनी या शेतीत वांग्याचे ‘सुपर गौरव’ या वाणाची रोपे नर्सरीमधून नऊ हजार रोपे २२ हजार ५०० रूपयांना खरेदी केली.

इतर खर्च शेणखत, मल्चिंगपेपर, ड्रिपनळी असे सर्व मिळून ३२ हजार रुपये खर्च केला. २४ एप्रिल २०२४ रोजी लागवड करून दीड महिन्यात पीक काढणीला आले. पहिल्याच काढणीला २० क्रेट्स निघाले. एक क्रेट्स २० किलो क्षमतेचे असून, वांगी खरेदी जागेवर ३५ रूपये किलोने केली. एक क्रेट्स ७०० रूपयांना विक्री झाले. (latest marathi news)

Agriculture Cultivation of brinjal flourished on muddy soft soil
Pune Nashik Expressway : ‘पुणे-नाशिक द्रुतगती’ला तूर्त स्थगिती; फेरविचार करण्याच्या सूचना

"पहिल्याच काढणीला १४ हजार रुपये मिळाले. दिनेश पाटील यांनी उत्कृष्ट पद्धतीने वांग्याचे पिक घेतल्याने परिसरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. पाळे खुर्दचे शेतकरी उस, मका, कांदा अशा प्रकारची पिके घेत आहेत. युवा शेतकरी गेल्या काही वर्षांपासून नवनवीन तंत्रज्ञान वापरून कमी जागेत व कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेऊन विविध भाजीपाला लागवडीकडे लक्ष देऊन आर्थिक सुबत्तेकडे लक्ष देत आहे." - भरत पाटील, संचालक, गिरणा कृषी, कळवण

"आम्ही दोन्ही भाऊ गेल्या दहा वर्षांपासून वेगवेगळी पिके व नवीन भाजीपाल्याचे विविध वाण वापरून कमी जागेत, कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेऊन शेती करतो. भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन जातींचे टोमॅटो, कोबी, मिरची व आता वांग्याची लागवड केली आहे." - दिनेश पाटील, शेतकरी, पाळे खुर्द

Agriculture Cultivation of brinjal flourished on muddy soft soil
Nashik Teacher Constituency Election : दराडे- ॲड. गुळवे- कोल्हे यांच्यात रंगणार तिरंगी सामना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.