Nashik Agriculture: सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णसंख्येत वाढ! मानवी आरोग्यावर परिणाम; रब्बी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

Farmers spraying crops due to outbreak of diseases due to climate change.
Farmers spraying crops due to outbreak of diseases due to climate change.esakal
Updated on

इगतपुरी : निसर्गाचा समतोल राखून ऋतुमानानुसार योग्य वातावरण असले, तर शेतकऱ्यांना निसर्ग दोन्ही हातांनी भरभरून देतो. मात्र, निसर्ग कोपला अन्‌ अस्मानी संकट आले, तर शेतकऱ्यांसह मानवप्राणी पूर्णतः उद्धवस्त झाल्याशिवाय राहत नाही.

असेच काहीसे वातावरणाचा प्रत्यय गेल्या आठवडाभरापासून इगतपुरी तालुक्यात अनुभवायला येत आहे.

सकाळी कडाक्याची थंडी, दुपारी ढगाळ वातावरण व तप्त उन्हामुळे दमट हवामान आणि तुरळक पाऊस, तर रात्री पुन्हा प्रचंड थंडी, अशा वातावरणामुळे शेतीसह मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत आहेत. (Nashik Agriculture Increase in number of patients of cold cough fever effects on human health Disease incidence on rabi crops)

वातावरणातील बदलामुळे कांदा, टोमॅटो, काकडी, कारले, दोडकी, वांगी, गहू, हरभरा, मसूर व इतर पिकांवर करपा, मावा आदी कीडींसह बुरशीजन्य रोगांचा प्रादूर्भाव दिसून येत आहे.

त्याचा परिणाम पिकांच्या प्रतवारीत होणार आहे. उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तापमानात घट झाल्याने दुधाळ जनावरांच्या आरोग्यावरही परिणाम दिसून येत आहे.

गायी- म्हशींचे दूध देण्याचे प्रमाण लिटर मागे कमी झाले आहे. सर्दी, खोकला, थंडी, ताप, सांधेदुखीच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Farmers spraying crops due to outbreak of diseases due to climate change.
Latur Water Crisis : जळकोटला ९० टक्के जलस्रोत तळाला; हिवाळ्यापासूनच तालुक्यात पाण्याची टंचाई

"थंडी, ढगाळ आणि दमट हवामानामुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. सर्दी, खोकला, थंडी, ताप यासारख्या आजारांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी प्राथमिक उपचार घ्यावेत. संसर्गजन्य आजारांवर मात करण्यासाठी काळजी घ्यावी."

-डॉ. अभिजित गाडे

"सात ते आठ दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर करपा, मावा, भुरी यासारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादूर्भाव झाला आहे. त्यामुळे फवारणीसाठी औषधे, खतांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे."

-सखाहरी जाधव, शेतकरी, मालुंजेवाडी

Farmers spraying crops due to outbreak of diseases due to climate change.
Nashik Milk Rate Fall: दूधाचे दर घटल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत! कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना होतेय कसरत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.