Nashik Agriculture News : खरिपाची 6 लाख हेक्टरवर लागवड; जिल्ह्यात खतांचे 2 लाख 20 हजार टन आवंटन मंजूर

Nashik News : यंदा जिल्ह्यात खरिपासाठी सहा लाख २८ हजार ७०० हेक्टर प्रस्तावित करण्यात आले. खरीप हंगामासाठी दोन लाख २० हजार टन खतांचे आवंटन मंजूर झाले.
Jowar
Jowar esakal
Updated on

Nashik News : यंदा मॉन्सून चांगला असल्याचे हवामान खात्याने जाहीर केल्यावर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. यंदा जिल्ह्यात खरिपासाठी सहा लाख २८ हजार ७०० हेक्टर प्रस्तावित करण्यात आले. खरीप हंगामासाठी दोन लाख २० हजार टन खतांचे आवंटन मंजूर झाले असून, ७१ हजार २४३ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. (Kharip is planted on 6 lakh hectares)

मेचा तिसरा आठवडा सुरू होण्यापूर्वी शेतकरी, तसेच कृषी विभागास खरिपाचे वेध लागतात. त्यानुसार कृषी विभागाने आगामी खरीप हंगामासाठी तयारीला सुरवात केली. शेतकऱ्यांकडून पीक लागवडीसाठी शेतजमीन तयार करण्याचे काम जोमात सुरू आहे. गेल्या वर्षी सहा लाख २६ हजार १९० हेक्टरवर खरिपाची लागवड झाली होती.

यंदा यात वाढ झाली असून, सहा लाख २८ हजार ७०० हेक्टर क्षेत्र खरिपासाठी निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पेरा यंदा मक्याचा असेल. दोन लाख ४२ हजार हेक्टरवर मका, ९४ हजार हेक्टरवर भात, तर केवळ ६०० हेक्टरवर ज्वारीची लागवड केली जाईल. याशिवाय, बाजरी ६१ हजार, नागली १६ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार आहे.

खरिपासाठी खते व बियाण्यांची मागणी करण्यात आली. खासगी आणि सार्वजनिक अशी एकूण ७१ हजार २४३ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. ‘महाबीज’कडून पाच हजार ८५१ क्विंटलची मागणी नोंदविण्यात आली. सोयाबीनसाठी प्रस्तावित एक लाख २२ हजार हेक्टरकरिता एक लाख एक हजार ६६४ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. (latest marathi news)

Jowar
Nashik News : पंचायत विकास निर्देशांक संकलनात नाशिक जिल्हा अव्वल! माहितीची 100 टक्के पडताळणी करून माहिती शासनाला सादर

पुढील आठवड्यात विभागात १० हजार क्विंटल बियाण्यांची खेप पोहोचेल, असे नियोजन आहे. जिल्ह्यासाठी दोन लाख ६० हजार टन खतांची मागणी करण्यात आली होती. यापैकी दोन लाख २० हजार ६०० टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे.

यात युरिया ७६ हजार ९०० टन, डीएपी १८ हजार ३०० टन, तर ‘एसएसपी’च्या २६ हजार ५०० टनांचा समावेश आहे. खतांची तपासणी करण्यासाठी पथके नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पथके तयार करण्याची तयारी केली आहे.

Jowar
Nashik News : ठाकरे गटातील निफाडचे 5 पदाधिकारी नजरकैदेत! पंतप्रधानांच्या सभेपूर्वी पोलिसांनी घेतले ताब्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.