Nashik Agriculture News: भात कापणीसाठी मजूर मिळेना! शेतकऱ्यांना महागडी यंत्रे न परवडणारी

Rice harvesting
Rice harvestingesakal
Updated on

टाकेदेवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्वच गाव-पाड्यांत भातकापणीच्या कामांना वेग आला आहे. सर्वच शेतकऱ्यांनी कापणी सुरू केली आहे. दिवाळी संपल्यानंतर तालुक्यातील मजूर वीटभट्टी व इतरत्र कामासाठी जात आहेत.

त्यामुळे भात कापणी करण्यासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे घरच्या सदस्यांच्या मदतीने सकाळपासूनच शेतावर बळीराजाची पिवळे सोने घरी आणण्यासाठी लगबग सुरू आहे. (Nashik Agriculture News No labor to harvest rice Farmers cannot afford expensive machinery)

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावठी भाताचे प्रसिद्ध असून, त्याला मागणीही मोठी आहे. मेहनत अधिक, त्या तुलनेत उत्पादन कमी मिळत असल्याने तरुण शेतीऐवजी कंपन्यांमध्ये रोजगार शोधत आहेत.

त्यामुळे हजारो एकर शेती पडिक झाली असून, त्याचा फटका शेती उत्पादनाला बसत आहे. यापूर्वी भात कापण्यासाठी तालुक्यातील डोंगराळ भागातील आदिवासी मजूर मोठ्या संख्येने मिळायचे.

मात्र, हाच कामगार एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करू लागले आहेत. तरुणाची नोकरीला अधिक पसंती मिळू लागल्याने तो शेती व्यवसायापासून दुरावत आहे.

Rice harvesting
Dhule Agriculture News : पपई फळाची पूजा करून हंगामाची सुरवात; कलमाडी येथे पहिली तोडणी

त्यामुळे परंपरागत शेती सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्याच घरातील मंडळींना घेऊन शेतावर काबाडकष्ट करावे लागत आहेत.

"सोन्यावानी शेतात पिकून आलेल्या पिकाची वेळीच कापणी करण्यास वेळेवर मजूर मिळत नसल्याने घरातील मंडळींना घेऊन शेतात जावे लागत आहे. उन्हाचा चटका वाढल्याने सकाळच्या प्रहरापासून ते दुपारी बारापर्यंत काम अधिक होते."- नंदकुमार दोंदे, शेतकरी

Rice harvesting
Nandurbar Agriculture News : आयान मल्टीट्रेड कारखान्यातर्फे 2600 रूपये दर जाहीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.