Nashik Agriculture News : कांदा, कपाशी, मका या ‘क’ फॅक्टरवरच मदार; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे नियोजन

Nashik News : भीषण दुष्काळाने मालेगाव तालुक्यासह कसमादे परिसर होरपळून निघाला. यात शासनाने मालेगाव तालुका दुष्काळी जाहीर केला. आजही तालुक्यात ३३ गावे व ७२ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
Maize crop in good condition
Maize crop in good conditionesakal
Updated on

विराणे : भीषण दुष्काळाने मालेगाव तालुक्यासह कसमादे परिसर होरपळून निघाला. यात शासनाने मालेगाव तालुका दुष्काळी जाहीर केला. आजही तालुक्यात ३३ गावे व ७२ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यावर्षी चांगले उत्पन्न मिळेल या आशेवर बळीराजाने खरिपाची पेरणी केली आहे. यंदा मात्र कपाशी, कांदा, मका या पिकांवरच शेतकऱ्यांची मदार आहे. (Nashik Agriculture News)

गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून तालुक्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत नगदी या पिकांना पसंती दिली आहे. तालुक्यासह कसमादेची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. पारंपरिक पिकांबरोबरच फळशेतीने कसमादेला मोठा हात दिला आहे. कोरडवाहू असो वा बागायती प्रत्येक शेतात वरील तीन पिके प्रामुख्याने घेतली जातात. तालुक्यातील कपाशीच्या २५ हजार ७९८ हेक्टर पैकी १८ हजार २५० हेक्टरवर ७०.७४ टक्के लागवड झाली आहे.

मका पिकाच्या ३८ हजार ८५० पैकी ३५ हजार ९४२ हेक्टरवर ९२.५१ टक्के पेरणी झालेली आहे. सध्या मिळत असलेला भाव पाहून पावसाळी कांदा लागवडीचे नियोजन सुरु आहे. अनेक शेतकऱ्यांकडे कांदा रोप शेतात तयार होत आहेत. तालुक्यात २६ हजार ७०० पैकी २१ हजार ५५० हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली आहे. मालेगावच्या पूर्व भागातील माळमाथ्यावर कपाशीचे पीक फुलले आहे.

मका पीक पावसावर अवलंबून असते. पावसाने जास्त दिवस ओढ दिल्यास विहिरीचे पाणी द्यावे लागते. कांदा पीक तीन टप्प्यांत घेता येते. पावसाळी, रांगडा, व उन्हाळी कांदा पिकविला जातो. तिन्ही पिकांना चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. ८० टक्के शेतजमीन या पिकांनी व्यापलेली आहे. बियाणे, खते, मजुरी, मशागत, पेरणी, पीक काढणे, वाहतूक आदि बाबतीत तीनही पिकांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो. म्हणून या पिकांतील "क" फॅक्टर यावर्षी तारेल अशी आशा आहे. (latest marathi news)

Maize crop in good condition
Nashik ZP News : सुपर फिफ्टीच्या निधीसाठी ‘नियोजन’ला साकडे; जिल्हा परिषद प्रशासनाकडून 2 कोटींची मागणी

"पूर्व मध्य माळमाथ्यातील शेतक-यांचे अर्थकारण कपाशीवरच अवलंबून आहे. नियमित पाऊस व चांगला भाव मिळाल्यास मागील वर्षाच्या दुष्काळाची भरपाई निघेल. शासनाने हमी भाव लवकरच जाहीर करावा" - समाधान साळुंके, उपसरपंच पळासदरे

"काटवन परिसरातील कांदा हे प्रमुख पीक आहे. कांदा पीक तीन वेळा वर्षातून घेता येते. परंतु दर नेहमीच स्थिर नसतात. यंदा कांद्याला चांगल्या भावाची अपेक्षा आहे. भाव मिळाल्यास दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळेल." - दीपक पाटील, शेतकरी वळवाडी.

"मका पीक पावसावर अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांपासून मक्याने तारले आहे. वाढत्या पोल्ट्री उद्योगामुळे मक्याला मागणी वाढली आहे. अडीच ते तीन हजार रुपये भाव मिळाल्यास दुष्काळाची पोकळी भरून निघेल." - रूपाली वाणी, माजी सरपंच, गाळणे

Maize crop in good condition
Nashik Police: ॲकॅडमीच्या संचालकांना पोलिसांचा दणका! जल्लोष भोवला; दोघांविरोधात मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.