Nashik Agriculture News : पिवळ्या सोन्याची होणार विक्रमी लागवड; खरिपाची तयारी

Nashik Agriculture : जिल्ह्यात वळीवाच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना आता खरीप हंगामाचे वेध लागले आहे.
corn
cornesakal
Updated on

Nashik Agriculture News : जिल्ह्यात वळीवाच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना आता खरीप हंगामाचे वेध लागले आहे. गेल्या वर्षी अवघा ६७ टक्के पाऊस झाल्याने दुष्काळाचा दाह गंभीर होता. यंदा हवामान विभागाने समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. कृषी विभागाने खरिपाचे नियोजन केले आहे. मालेगाव तालुक्यात खरीप पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ९५ हजार २७८ हेक्टर आहे. (Record planting of corn Preparation for Kharif )

यात ५५ टक्क्यापेक्षा अधिक क्षेत्रात मका (पिवळ्या सोन्याचे) अंदाजे ५१ हजार हेक्टर क्षेत्र लागवड अपेक्षित आहे. शहर व परिसरात मेच्या अखेरीस पारा ४१ ते ४३ अंश सेल्सिअस असा आहे. मेच्या अखेरीस व जूनच्या सुरवातीला आणखी एकदा वळीवाचा पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व मशागतीला सुरवात केली आहे. जूनच्या प्रारंभी वळीवाचा पाऊस झाल्यानंतर काही प्रमाणात तापमान कमी होईल.

यावेळी प्रामुख्याने बागायती भागात टोमॅटो, सिमला मिरची व भाजीपाला लागवडीला काही प्रमाणात सुरवात होईल. खरीप हंगामासाठी खते, बियाणे आदींची पूर्तता सुरू आहे. शेतकऱ्यांनी नोंदणीकृत कृषी निविष्ठा धारकांकडून बियाणे खरेदी करावेत. बियाणे खरेदी केल्याची पावती घ्यावी, कपाशीसाठी एचटीबीटी खरेदी करू नये. शंभर टक्के समाधानकारक पाऊस झाल्याशिवाय खरिपाची पेरणी करू नये असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी गोकूळ आहिरे यांनी केले आहे.

खरिपातील मका हे हमीभाव देणारे, हमखास उत्पन्न देणारे पीक असल्याने मक्याचे क्षेत्र वाढणार आहे. त्यापाठोपाठ सुमारे २७ हजार हेक्टर क्षेत्राात कपाशी लागवड अपेक्षित आहे. साडेतेरा हजाराहून अधिक क्षेत्रात बाजरी लागवड होईल. गळीत धान्यासह भुईमुगाच्या लागवडीत दिवसेंदिवस घट होत आहे. कडधान्यात डाळींचे प्रमाण घटले आहे. खरिपात ५ हजार हेक्टर कांदा लागवड अपेक्षित आहे. तथापि कांदा लागवडीचे क्षेत्र वाढू शकते. (latest marathi news)

corn
Nashik Agriculture News: नांदगावची केळी सौदी अरेबियात खाणार भाव! बोराळेच्या राजपूत कुटुंबियांचा प्रयोग यशस्वी; लाखोंची उलाढाल

खरिपाचे प्रस्तावित क्षेत्र असे (हेक्टर)

बाजरी - १३ हजार ७४५

ज्वारी - ४४८

मका - ५० हजार ९०९

तूर - ६२५

मुग - ८००

उडीद - १८५

भुईमूग - ८९०

सोयाबीन - ४४७

कापूस - २७ हजार ३३०

एकूण खरीप - ९५ हजार ५२५

खरीप कांदा ः ५ हजार हेक्टर

corn
Nashik Agriculture News : खरिपात कांद्यासह मका, सोयाबीनचा बोलबाला; येवल्यात पांढरे सोनं, बाजरी घटणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com