Nashik Agriculture News : यंदा सव्वासहा लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी; खरीप हंगाम आढावा बैठकीत खते, बियाण्यांचे नियोजन

Nashik News : यंदा जिल्ह्यात खरिपासाठी ६ लाख २८ हजार ७०० हेक्टर प्रस्तावित करण्यात आले आहे. ऐन पावसाळ्यात खतांची व बियाण्यांचा काळाबाजार होवू नये, यासाठी कृषी विभागाने १७ पथकांची नियुक्ती केली.
Sowing of kharif on 6 lakh hectares this year
Sowing of kharif on 6 lakh hectares this yearesakal
Updated on

Nashik News : यंदा मॉन्सून चांगला बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. यंदा जिल्ह्यात खरिपासाठी ६ लाख २८ हजार ७०० हेक्टर प्रस्तावित करण्यात आले आहे. ऐन पावसाळ्यात खतांची व बियाण्यांचा काळाबाजार होवू नये, यासाठी कृषी विभागाने १७ पथकांची नियुक्ती केली आहे. (Sowing of kharif on 6 lakh hectares this year)

तसेच युरिया साडेआठ हजार टन बफर स्टॉक करून ठेवल्यामुळे खतांची टंचाई जाणवणार नसल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. कृषी विभागाचे प्रधान सचिव जोशी यांनी शुक्रवारी (ता.२४) ऑनलाइन पद्धतीने कृषी विभागाची खरीप हंगाम आढावा बैठक घेतली. कृषी विभागाचे आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, विकास पाटील सहभागी झाले, तर जिल्हाधिकारी जलज शर्मा, कृषी अधीक्षक विवेक सोनवणे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

खरीप हंगामासाठी २ लाख २० हजार टन खतांचे आवंटन मंजूर झाले असून, ७१ हजार २४३ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. मे महिन्याचा तिसरा आठवडा सुरू होण्यापूर्वी शेतकरी, तसेच कृषी विभागास खरिपाचे वेध लागतात. त्यानुसार कृषी विभागाने आगामी खरीप हंगामासाठी तयारीला सुरवात केली आहे. शेतकऱ्यांकडून पीक लागवडीसाठी शेतजमीन तयार करण्याचे काम जोमात सुरू आहे.

गतवर्षी ६ लाख २६ हजार १९० हेक्टरवर खरिपाची लागवड झाली होती. यंदा यात वाढ झाली असून ६ लाख २८ हजार ७०० हेक्टर क्षेत्र खरिपासाठी निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पेरा यंदा मक्याचा असेल. दोन लाख ४२ हजार हेक्टरवर मका, तर ९४ हजार हेक्टरवर भात तर, केवळ ६०० हेक्टरवर ज्वारीची लागवड केली जाईल. याशिवाय बाजरी ६१ हजार, नागली १६ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार आहे. (latest marathi news)

Sowing of kharif on 6 lakh hectares this year
Nashik ZP School : हाणामारी करणारे दिंडोरीतील 2 शिक्षकांचे निलंबन!

खरीपाकरिता खते व बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. खासगी आणि सार्वजनिक अशी एकूण ७१ हजार २४३ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. महाबीजकडून ५ हजार ८५१ क्विंटलची मागणी नोंदविली आहे. सोयाबीनसाठी प्रस्तावित १ लाख २२ हजार हेक्टर करिता १ लाख १ हजार ६६४ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे.

पुढील आठवड्यात विभागात १० हजार क्विंटल बियाण्यांची खेप पोहचेल असे नियोजन आहे. जिल्ह्यासाठी २ लाख ६० हजार टन खतांची मागणी करण्यात आली होती. यापैकी २ लाख २० हजार ६०० टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे.

Sowing of kharif on 6 lakh hectares this year
Nashik Lok Sabha Constituency : स्थानिक मुद्यांवर रोष कायम; मताधिक्याबाबत उत्सुकता

यात युरिया ७६ हजार ९०० टन, डीएपी १८ हजार ३०० टन तर, एसएसपीचे २६ हजार ५०० टनांचा यात समावेश आहे. खतांची तपासणी करण्यासाठी पथके नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पथके तयार करण्याची तयारी केली आहेत.

कृषी विभागाची तयारी

ऐन पावसाळ्यात एकाच वेळी बियाण्यांसह खतांच्या मागणीच वाढ होते. त्यामुळे महाराष्ट्रात गुजरात व मध्य प्रदेशातून बोगस बियाणे दाखल होण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने कृषी विभागाने १७ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. एका शेतकऱ्याला खतांच्या पाच बॅगा दिल्या जातील. त्यामुळे खतांची साठवणूक करण्यावर मर्यादा घातली जाणार आहे. साडेआठ हजार टन युरियाची साठवणूक केल्यामुळे टंचाई निर्माण होताच हा युरिया बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.

Sowing of kharif on 6 lakh hectares this year
Nashik ZP News : परस्पर सुट्टी घेणाऱ्या उपशिक्षणाधिकाऱ्यास नोटीस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.