अभोणा : दिवसेंदिवस रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता, उत्पादकता कमी होऊन, पिकामधील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. पर्यायाने हवामानाच्या थोड्या बदलाचाही परिणाम पिकांवर प्रभाव ठरतो. उत्पादन खर्च जास्त तर त्यातून मिळणारे उत्पन्न कमी. अशी स्थिती असते.
यावर उपाय म्हणून येथील गिरणा ऍग्रो व्हीजनने 'जीवामृत' स्लरीचा अभिनव उपक्रम हाती घेऊन, कृषी क्षेत्राला संजीवनी देण्याचे कार्य सुरु केले आहे. वंजारी (ता. कळवण) येथे स्लरी प्रकल्प उभारला आहे. (Agriculture Unique initiative of Jivamrit Slurry)