Nashik Agriculture News : बळिराजाला पावसाची प्रतिक्षा खरीप हंगामाची पूर्वतयारी पूर्ण

Farmer Waiting For Rain
Farmer Waiting For Rainesakal
Updated on

Nashik News : खरीप हंगामातील शेतकऱ्यांकडून पूर्वतयारी झाली असली तरी पावसाची प्रतिक्षा मात्र कायम आहे. दरम्यान शेती मशागतीसह बि-बियाणे शेतकऱ्यांकडून खरेदी करून ठेवल्याने पावसाचे आगमन होताच शेतीशिवारात पेरणीला वेग येणार आहे.

शेतीशिवारात खरीप हंगामातील जोरदार तयारी झाली असली तरी पाऊस अजून बरसत नाही. यामुळे खरीप हंगामाला उशीर होत असल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे ढग दाटून येत आहेत. दरम्यान बऱ्याच ठिकाणाहून आता देवालयात पावसासाठी साकडे घातले जाऊ लागले आहे.( Nashik Agriculture Update Farmer waiting for rain preparation for Kharif season completed Nashik News)

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांची तपासणी उपविभाग व तालुकास्तरीय भरारी पथकामार्फत तपासणी केली जाणार आहे.

तपासणी दरम्यान विक्रेत्यांना परवानगी दर्शनीय भागात प्रदर्शित करणे, बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशक यांचे दरफलक, साठाफलक लावण्याबाबत सूचना करण्यात येत आहेत.

तसेच तपासणी वेळेत आढळून आलेल्या त्रुटींना अनुसरून विक्री बंद आदेश काढण्यात येईल अनुदानित रासायनिक खते विक्री ई-पॉस प्रणालीद्वारे होत आहे किंवा नाही याबाबत दक्षता घेण्यात येत आहे.

रासायनिक खते विक्री करताना खतांसोबत इतर विद्राव्य खते लिकिंग होणार नाही याबाबत सूचना दक्षता घेण्यात येत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Farmer Waiting For Rain
Agri Tourism Centre : वाजगावच्या देवरे भगिणींनी साकारले नाविन्यपूर्ण कृषी पर्यटन केंद्र!

विक्रेत्यांवर बंदी

खरीप हंगामात कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा कृषी आधिक्षक विवेक सोनवणे, कृषी विकास आधिकारी जिल्हा परिषद कैलास शिरसाठ यांच्या मार्गदर्शनानुसार बागलाण तालुक्यातील सात बियाणे विक्रेत्यांना विक्री बंद आदेश देण्यात आलेले आहेत.

तसेच पाच रासायनिक खते विक्रेत्यांना विक्री बंद आदेश देण्यात आले आहेत. सदर कारवाई उपविभागीय कृषी आधिकारी गोकुळ आहिरे, प्रभारी तालुका कृषी आधिकारी मोनाली बागुल, पंचायत समितीचे कृषी आधिकारी प्रणय हिरे यांनी केलेली आहे.

Farmer Waiting For Rain
Nashik: NMCत आयुक्तांकडून पदानुक्रमात ‘करेक्शन’! प्रशासन, नगर नियोजन व गुण नियंत्रण विभाग अधिकार कक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.