Nashik AIMA News : अक्राळेतील औद्योगिक भूखंड विक्री लिलाव पद्धतीने करू नका; आयमाचे MIDC अधिकाऱ्यांना साकडे

Nashik AIMA : दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथील औद्योगिक भूखंड विक्री लिलाव पद्धतीने न करता प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वाने त्याचे वाटप व्हावे आणि भूखंड विक्रीची संख्या वाढवावी
Nashik AIMA
Nashik AIMA esakal
Updated on

Nashik AIMA News : दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथील औद्योगिक भूखंड विक्री लिलाव पद्धतीने न करता प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वाने त्याचे वाटप व्हावे आणि भूखंड विक्रीची संख्या वाढवावी, अशी मागणी अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन(आयमा) ने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (Nashik AIMA marathi news)

नाशकात अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीत उद्योग व्यवसायासाठी भूखंड शिल्लक नसल्याने नवीन उद्योगांसाठी तळेगाव-अक्राळे येथील जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आरक्षित केली आहे. त्यातील मोजकेच २७ भूखंड विक्रीसाठी खुले केले आहेत. त्यासाठी तब्बल १९७ अर्ज प्राप्त झाल्याचे कळते.

यामुळे लिलाव पद्धतीने या भूखंडांची विक्री होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे कळते. तसे झाल्यास फक्त बडे आणि सधन गुंतवणूकदारच हे भूखंड खरेदी करतील व लहान उद्योजक भूखंड खरेदी करण्यापासून वंचित राहतील. त्यामुळेच प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वाने ज्या उद्योजकांचे भूखंड कर्जासाठी अर्ज आले असतील त्याप्रमाणे त्यांना अक्राळे येथील भूखंडांचे वाटप करावे.

Nashik AIMA
AIMA MAT : इंटरनेट आधारित टेस्टच्या रजिस्ट्रेशनसाठी दोनच दिवस मुदत

तसेच भूखंड विक्रीची संख्या वाढवावी. यामुळे नवीन उद्योजकांवर अन्याय होणार नाही व त्यांनाही उद्योग व्यवसाय सुरु करता येईल, असेही आयमातर्फे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन शर्मा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे यांनाही पाठविल्या आहेत. निवेदनावर आयमाचे अध्यक्ष ललित बूब, सरचिटणीस प्रमोद वाघ तसेच बीओपीपी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे यांच्या सह्या आहेत. ( latest marathi news )

Nashik AIMA
Nashik AIMA Election : ‘आयमा’ निवडणुकीत एकता पॅनलची सत्ता अबाधित; विरोधक आमले यांची एकाकी झुंज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()