नाशिक : पोषक वातावरणासाठी नाशिकची जगभरात ओळख असताना गेल्या काही वर्षांमध्ये वायुप्रदूषण गंभीररीत्या वाढल्याने नाशिकची हवा धोकादायक बनली आहे. वायुप्रदूषणासाठी निर्धारित मानांकनांचे उल्लंघन करताना शहरासह जिल्हास्तरावर हवेची गुणवत्ता गेल्या काही वर्षांमध्ये खालावली आहे.
उद्योग, वाहतूक, रस्त्यावरील धूळ, निवासी क्षेत्र, वीटभट्या, बांधकाम, स्मशानभूमी, स्टोन क्रशर, बेकरी, हॉटेल आणि रेस्टोरंट्स अशा अकरा क्षेत्रांतून विषारी घटकांचे हवेत उत्सर्जन होऊन वायुप्रदूषण होत असल्याचे बुधवारी (ता.१८) प्रकाशित केलेल्या अहवालातून समोर आले आहे. (Nashik Air Pollution Nashik pleasant air affected by pollution 11 factors cause nashik news)
दी एनर्जी ॲन्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी), स्विस एजन्सी फॉर डेव्हलपमेंट ॲन्ड कॉर्पोरेशन (एसडीसी) आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सहकार्याने नॅशनल एनव्हॉयर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (नीरी) संस्थेने अहवाल प्रकाशित केला.
'क्लीन एअर प्रोजेक्ट'अंतर्गत 'नाशिक एमिशन इन्हेंटरी रिपोर्ट' या अहवालात वायुप्रदूषण वाढीची प्रमुख कारणे विशद केलेली आहेत. ठराविक ठिकाणांहून माहिती संकलित केलेली असल्याने विस्तारित स्वरूपातील सर्वेक्षणात वेगळे निष्कर्ष निघण्याची शक्यता या वेळी व्यक्त करण्यात आली.
बुधवारी झालेल्या कार्यशाळेत अहवालातील निष्कर्ष प्रसिद्ध केले आहेत. या अभ्यासात वायुप्रदूषणाच्या स्त्रोतांची माहिती गोळा करण्यात आलेली आहे. यातून धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत.
प्राथमिक सर्वेक्षण करून विषारी वायू उत्सर्जन करणाऱ्या काही क्षेत्रांची आकडेवारी संकलित केलेली आहे. तर काही डेटा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदान केलेला आहे. त्याआधारे हा अहवाल साकारला आहे.
दरम्यान, देशातील १३२ शहरांमध्ये वायुप्रदूषणासाठी निर्धारित मूल्यांकनाहून अधिक प्रमाणात विषारी घटक आढळून आलेले आहेत. यामध्ये राज्यातील सतरा ठिकाणांचा समावेश असल्याची माहिती या वेळी वैज्ञानिकांनी दिली.
हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून
वाहतुकीतून सर्वाधिक उत्सर्जन
वाहनांतून उत्सर्जित होणारा धूर व वाहनांची दळणवळण यामुळे हवेत सर्वाधिक प्रमाणात विविध प्रकारचे विषारी घटक मिसळत असल्याचे समोर आले आहे. शहरासह जिल्हास्तरावर पीएम-१० उत्सर्जनात वाहतूक क्षेत्राचे प्रमाण ३० टक्के आहे.
तर पीएम-२.५ उत्सर्जनात वाहतूक क्षेत्राचे प्रमाण जिल्हा व शहरासाठी अनुक्रमे ४६ व ४५ टक्के आढळले. हवेत नायट्रोजन ऑक्साईड मिसळून वायुप्रदूषण होण्यास जिल्ह्यात ८२ टक्,के तर शहरात ९४ टक्के प्रमाण वाहतूक क्षेत्राचे आहे.
अहवालातील निष्कर्ष असे
- उद्योजकांमुळे होतेय कणीक पदार्थ (पीएम १०) प्रदूषण
- पीएम-१० उत्सर्जनात उद्योग ४० टक्के, वाहतूक क्षेत्राचे प्रमाणे ६० टक्के
- वाहतुकीतून धूलीकण (पीएम २.५) चे सर्वाधिक प्रदूषण होतेय. त्यापाठोपाठ उद्योग कारणीभूत ठरत आहेत
- रस्त्यावरील धूळ, बेकरी, निवासी उत्सर्जनातून पीएम-१०, पीएम-२.५ घटक हवेत मिसळताय
- सिडको, सातपूर गाव, मुंबई नाका, कोणार्कनगर परिसर बनलेत धूलिकरण (पीएम-१०) प्रदूषणाचे हॉटस्पॉट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.