Deputy Chief Minister Ajit Pawar, Minister Chhagan Bhujbal and office bearers at the inauguration of Shiv Srishti in Yewla.
Deputy Chief Minister Ajit Pawar, Minister Chhagan Bhujbal and office bearers at the inauguration of Shiv Srishti in Yewla.esakal

Yeola Shiv Srishti: आचारसंहितेपूर्वी शिवसृष्टीला वाढीव निधी देणार : अजित पवार; येवल्यातील शिवसृष्टीचे दिमाखात लोकार्पण

Latest Nashik News : निधी अभावी काम खोळंबले अशी वेळ येऊ देणार नाही असे आश्वासनउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
Published on

येवला : येथे साकारकेल्या शिवसृष्टीतील सिहासनारुढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महाराष्ट्रातील सर्वात मोठा असून हे येवलेकरांचे भाग्य आहे. महाराजांच्या नावाला साजेसा पुतळा आहे. राजदरबाराप्रमाणे ही शिवसृष्टी असून शिवसृष्टीच्या कामाला अजूनही १० ते १५ कोटी निधीची गरज असून आचारसंहिता लागण्याच्या आत हा निधी उपलब्ध करून देणार. निधी अभावी काम खोळंबले अशी वेळ येऊ देणार नाही असे आश्वासनउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. (inauguration of Shiva Srishti in Yeola)

मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराजाच्या आधारित साकारण्यात आलेल्या शिवसृष्टीच्या लोकार्पणप्रसंगी आयोजित समारंभात मंत्री पवार बोलत होते. यावेळी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जि.प.अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, बाजार समिती सभापती सविता पवार, माजी. जि.प.सदस्य डी. के. जगताप, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, दिलीप खैरे आदी उपस्थित होते.

प्रारंभी श्री.पवार तसेच श्री. भुजबळ यांच्या हस्ते महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, शिवसृष्टी प्रकल्पाचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्याचे भाग्य मला येवलेकरांमुळे मला लाभले. ही क्रांतिकारकांची भूमी असून याठिकाणी मंत्री भुजबळ यांनी प्रतिनिधित्व करत हजारो कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहे.

मांजरपाडा सारखा महत्त्वपूर्ण प्रकल्प त्यांनी पूर्ण केले असून येथील चेहरामोहरा बदलण्यात त्यांचे योगदान महत्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर काम करून त्यांचा इतिहास पुढेही कायम रहावा यासाठी त्यांच्या किल्ल्यांचा विकास सरकार करत असल्याचे पवार यांनी सांगितले.

याप्रसंगी मतदारसंघात मंत्री छगन भुजबळ यांनी हजारो कोटी रुपयांची विकासकामे केली आहे. या विकासकामांच्या सचित्र दिनदर्शिकेचे प्रकाशन उपमुख्यमंत्री पवार व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी येवला नाशिक महामार्गावर जुन्या पंचायत समितीच्या जागेवर साकारलेल्या शिवसृष्टीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.

मोहन शेलार, रतन बोरणारे, रवींद्र पगार, संध्या पगारे, सुवर्णा जगताप, हुसेन शेख, किशोर सोनवणे, पांडुरंग शेळके, प्रेरणा बलकवडे, साहेबराव मढवई, अरुण थोरात आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. वसंत पवार यांनी प्रास्ताविक, अभिनेता अभिजित खांडकेकर, डॉ.नागेश गवळी यांनी सूत्रसंचालन केले. (latest marathi news)

Deputy Chief Minister Ajit Pawar, Minister Chhagan Bhujbal and office bearers at the inauguration of Shiv Srishti in Yewla.
Prakash Ambedkar : जनता विचारते आहे, पाच वर्ष झोपले होते का? मोदी-शहा यांच्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही : प्रकाश आंबेडकर

महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले : भुजबळ

मंत्री छगन भुजबळ म्हणाले,की मतदारसंघात मुक्तिभुमी, महात्मा फुले नाट्यगृह, प्रशासकीय इमारत, पैठणी पर्यटन केंद्र, विविध स्मारके अशी हजारो कोटी रुपयांची विकासकामे आपण केली. त्यातील एक महत्त्वपूर्ण काम शिवसृष्टी असून येवल्याला भूषवाह ठरेल असा शिवसृष्टी प्रकल्प आपण उभा केला.

अजून काही काम बाकी आहे. महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना आणि महाराजांचे सेनापती यांचे शिल्पे भित्तीचित्रे, शिवकालीन शस्त्रारांचे आणि गड किल्ल्यांचे प्रदर्शनशिवकालीन इतिहासाची माहिती देण्यासाठी ऑडिओ व्हिज्युअल रूम,फाऊटन्स व गार्डन ही सर्व कामे आपण लवकरच करणार आहोत असे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.

यांचा झाला विशेष सन्मान

यावेळी अभिनेते भूषण प्रधान, अविनाश नारकर,अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, गायक आदर्श शिंदे, शाहीर प्रा.डॉ.गणेश चंदनशीवे, सरिता सोनवणे, मूर्तीकार, बाळकृष्ण (दाजी) पांचाळ, नंदकिशोर पांचाळ, वास्तूविशारद सारंग पाटील, ठेकेदार पंकज काळे यांचा सन्मान करण्यात आला.

Deputy Chief Minister Ajit Pawar, Minister Chhagan Bhujbal and office bearers at the inauguration of Shiv Srishti in Yewla.
Aapli Godavari : ‘आपली गोदावरी’ स्पर्धेस आजपासून प्रारंभ! महापालिका, नगर परिषदेतर्फे आयोजन; 15 लाख रुपयांची बक्षिसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.