Electricity bill Free : राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांचे वीजबिल माफ : अजित पवार

Electricity bill : शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकमध्ये दिली.
Ajit Pawar
Ajit Pawar esakal
Updated on

नाशिक : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांची बोलती बंद झाली आहे. आम्हीही अशी योजना सुरू करणार असल्याचे आता विरोधक सांगत आहेत. लाडक्या बहिणींच्या प्रपंचाला हातभार लावला; पण लाडका भाऊ उपाशी राहिल्याची टीका विरोधकांकडून होते. पण, त्यांच्यासाठी ४४ लाख शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकमध्ये दिली. (Ajit Pawar statement of Electricity bill waived for 44 lakh farmers in state )

‘राष्ट्रवादी’च्या आमदार सरोज अहिरे यांच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन मंगळवारी (ता. १५) अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की आपल्या पक्षाचे भक्कम नेते बाबा सिद्दिकी आपण गमावले आहेत. आम्ही सतत लोकांशी संपर्क ठेवतो, काम करतो. जात-पात पाहत नाही. (latest marathi news)

Ajit Pawar
Electricity Bill : वीजबिल थकबाकीत पश्‍चिम महाराष्ट्र पुढे

अठरा पगड जातींना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. त्या पद्धतीने यशवंतराव चव्हाण यांनी जसे सुसंस्कृत राज्य चालविले, तशा पद्धतीचे प्रयत्न आम्ही करीत असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री म्हणून शेवटचे उद्‍घाटन आहे. यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून प्रचाराला येणार असल्याचे त्यांनी म्हटले.

सर्वाधिक भाग्यवान भाऊ

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनवायचे आहे. आचारसंहिता लागणार म्हणून लवकर खात्यात पैसे टाकले. रक्षाबंधनानिमित्त दिलेले पैसे व भाऊबीज ओवाळणी म्हणून महिलांना भेट दिल्याचे खूप समाधान मिळाले. काही लोकांच्या पोटात दुखले, काही जण कोर्टात गेले. मी जगातील सर्वाधिक भाग्यवान भाऊ आहे. हजारो राख्या मला बांधल्या. यंदाची राखी पौर्णिमा मी आयुष्यात विसरू शकणार नाही, असे भावनिक उद्‍गारही अजित पवारांनी काढले.

Ajit Pawar
Free Electricity : कृषीपंपाना मोफत विजेचा अध्यादेश अखेर जारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.