Nashik Ajit Pawar News : ‘वसाका’ बाबत लवकरच मार्ग काढणार : अजित पवार

Nashik News : वसंतदादा सहकारी साखर कारखाना विठेवाडी हा नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य साखर कारखाना असून कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नावारूपास आलेली सहकारी संस्था होती.
While giving a statement to Deputy Chief Minister Ajit Pawar, MLA Dr. Rahul laughs
While giving a statement to Deputy Chief Minister Ajit Pawar, MLA Dr. Rahul laughsesakal
Updated on

देवळा : वसाका साखर कारखान्याची विक्री होऊ न देता तो भाडे कराराने वा इतर योग्य पर्यायी मार्गाने त्याच्या अडचणी सोडवत तो ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत, त्यासाठी खास बैठक घेत त्यावर तोडगा काढावा अशी मागणी आमदार डॉ.राहुल आहेर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडे शुक्रवार (ता.२) रोजी केली. कळवण तालुक्यात दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत मुंबईत सोमवारी (ता.५) रोजी बैठक घेत यावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. (Will find way soon regarding vasant dada sugar factory)

वसंतदादा सहकारी साखर कारखाना विठेवाडी हा नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य साखर कारखाना असून कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नावारूपास आलेली सहकारी संस्था होती. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये चुकलेले आर्थिक नियोजन, कमी झालेली ऊस उत्पादक क्षमता, बँकेचा वाढलेला कर्जाचा बोझा व इतर कारणास्तव काही वर्षांपासून कारखाना अडचणीत सापडला आहे.

मागील काळामध्ये वसाका कारखाना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ली. मुंबई (शिखर बँक) यांनी ताब्यात घेउन प्रथम अशासकीय मंडळाला व नंतर डि. व्ही.पी. ग्रुप धाराशिव यांना भाडेकराराने चालविण्यास दिला होता. परंतु २-३ वर्ष कारखाना चालवल्यानंतर डी.व्ही.पी ग्रुप ने कारखाना चालविण्यास असमर्थता दाखवल्याने कारखाना सद्य:स्थितीत बंद आहे.

अशा वेळेस शिखर बँकेने कारखाना विक्रीची निविदा प्रसिद्ध केलेली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी, कामगार वर्ग व कारखान्याच्या सभासदांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असून सर्वांची भावना वसाकाची विक्री न होता शिखर बँकेने भाडे कराराने चालविण्यास द्यावा अशी आहे. (latest marathi news)

While giving a statement to Deputy Chief Minister Ajit Pawar, MLA Dr. Rahul laughs
Nashik Ajit Pawar Daura : कळवण, सुरगाणासाठी आणखी 25 कोटी : उपमुख्यमंत्री अजित पवार

या साऱ्या पार्श्वभूमीवर शिखर बँकेच्या संबंधित सर्व घटकांसोबत आपल्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन कारखाना ऊर्जितावस्थेत आणण्यास मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबाबतची माहिती जाणून घेतल्यावर मुंबईत तत्काळ सोमवारी (ता.५) रोजी बैठक घेत मार्ग काढण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

यावेळी आमदार नितीन पवार, देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, माजी सभापती विलास देवरे, बापू देवरे, वसाका बचाव समितीचे सुनील देवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर आदी उपस्थित होते.

While giving a statement to Deputy Chief Minister Ajit Pawar, MLA Dr. Rahul laughs
Nashik News : सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी जनजागृती पर फलकांची मात्रा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.