मालेगाव : चारशे पारचा नारा देणारे केंद्रात तीनशे पार होऊ शकले नाहीत. लोकसभेच्या निवडणुकीपासून भाजप हतबल झाला आहे. केंद्रातील सरकार जास्त दिवस टिकणार नाही. वक्फ बोर्डाचे विधेयक आणून भाजप सरकार मुस्लिमांच्या जमीन बळकवण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका करीत समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रात घडू देऊ नका असे आवाहन केले. (Akhilesh Yadav nashik daura)