सिडको : धोक्याचा भोंगा वाजतो... सर्वत्र धावपळ सुरू होते... अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका ‘सायरन’ वाजवित गोविंद नगरमध्ये पोचतात... यंत्रणेची धावपळ सुरू होते. अन मनपाकडून गोविंदनगर परिसरातील चंद्रमौळी या बहुमजली रहिवासी इमारतीमध्ये मॉक ड्रिल असल्याचे लक्षात येताच जीव भांड्यात पडतो.
मंगळवारी (ता.१६) येथे आग विझविण्याचे मॉक ड्रिल करण्यात आले. त्यामध्ये धुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका तसेच हायड्रोलिक प्लॅटफॉर्म ब्रँटोच्या (उंच शिडी) सहाय्याने आश्रयस्थान भागातून (रिफ्युज एरिया) लहान मुलांना बाहेर काढण्यात आले. (Nashik mock drill at govind nagar chandramauli building marathi news)
नाशिक महापालिका अग्निशमन विभागामार्फत १४ ते २० एप्रिल दरम्यान अग्निशमन सेवा सप्ताहनिमित्त विविध उपक्रम राबवले जात आहेत. चंद्रमौळी इमारतीमधील महिलांना अग्निनिर्वाणके (फायर एक्सटिंगुशर) कशाप्रकारे हाताळून आग विझवावी, याबाबत माहिती दिली.
एलपीजी गॅस सिलिंडर हाताळताना कशाप्रकारे काळजी घ्यावी, याचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. आग लागली तर कशी आटोक्यात आणावी, याबाबत नागरिकांना माहिती दिली. जवानांनी इमारतीमधील आग प्रतिबंधक उपाययोजना कशाप्रकारे ऑपरेट करायची याचीही माहिती दिली. (latest marathi news)
या मॉक ड्रिलमध्ये चंद्रमौलीचे चेअरमन किरण सोनार, सचिव नितीन कोठावदे, डॉ. राहुल जगताप, धनंजय वाड, भूषण पाचपुते, संकल्प गोयरोला, सुधीर चंद्रात्रे, योगेश बागूल, सुधीर वरखेडे, शशी कुमार, अवंती वाड, सानिका सांगळे, सोनावणे, अक्षय जैन, पूजा हिरे, सुहासिनी पाटील, रूपाली दुशिंग, प्रतिभा सोनार, प्रसन्न रानजिता, कल्पना गिरासे, नागरे, डॉ. मयूरी पाटील, प्राप्ती महाजन यांच्यासह मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी, अग्निशामक अधिकारी प्रदीपसिंग परदेशी, लीडिंग फायरमन प्रमोद लहामगे, मोहन मध्ये, मुकुंद सोनवणे, अर्शद पटेल, चव्हाणके, वाहन चालक नंदू व्यवहारे, शांताराम गायधनी, मुस्ताक पाटकरी तसेच महाराष्ट्र फायर सर्व्हिस अकादमीच्या १० जवानांनी सहभाग घेतला.
आर्यवर्त सोसायटीतील बी विंग मध्ये देखील अशाच प्रकारचे मॉकड्रीलचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. नागरिकांनीही भविष्यात समय सूचकता पाळण्याचे आश्वासन दिले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.