नाशिकमध्ये फुटणार फटाके! सर्वपक्षीयांनी एकमताने फेटाळला प्रस्ताव

Fireworks
Fireworks sakal media
Updated on



नाशिक : विभागीय आयुक्त राधाकृष्म गमे यांनी हवेची गुणवत्ता राखण्यासाठी महासभेत फटाके बंदीचा ठराव संमत करण्याची सक्ती केल्याने ऐनवेळी महासभेत सादर झालेल्या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध करत एकमताने फटाके बंदीचा विषय फेटाळून लावला.

आयुक्तांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व महापालिका, पालिका व नगर परिषदांमध्ये या बाबींची पूर्तता होईल, यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना पत्राद्वारे दिल्या होत्या. दरम्यान, विभागीय आयुक्तांना १ सप्टेंबरला पत्र प्राप्त झाले असताना १८ ऑक्टोबरला म्हणजे तब्बल दीड महिन्यांनी पत्र नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सुपूर्द केल्याने खळबळ उडाली होती. शिवसेनेने यापूर्वीच विरोध दर्शविला होता. आजच्या महासभेत ऐनवेळी हा विषय पत्रिकेत समावेश करण्यात आला. त्यापूर्वी विभागीय आयुक्तांनीच पत्र मागे घेतल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीदेखील फटाकेबंदीचे पत्र मागे घेण्याची सूचना करण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान, महासभेवर जादा विषयांत प्रस्ताव सादर करण्यात आल्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध केल्यानंतर तत्काळ फटाकेबंदीचा विषय फेटाळण्यात आला

Fireworks
त्रुटी आढळल्यास माहिती मागविण्यात येईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.