Nashik News : आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचा ‘संपूर्ण’तून सर्वांगीण विकास; 39 शाळांत पथदर्शी प्रकल्‍पातून मार्गदर्शन

Nashik : दुर्गम, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शालेय जीवनात आत्‍मविश्‍वास वाढविण्यासह त्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी ‘संपूर्ण’ हा प्रकल्‍प राबविला जात आहे.
Ongoing guidance to students throughout the project.
Ongoing guidance to students throughout the project.esakal
Updated on

Nashik News : दुर्गम, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शालेय जीवनात आत्‍मविश्‍वास वाढविण्यासह त्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी ‘संपूर्ण’ हा प्रकल्‍प राबविला जात आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील ३९ शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचा पाया भक्‍कम करणे, त्‍यासोबत करिअरविषयी मार्गदर्शन केले जात आहे. (nashik development of students in ashram schools marathi news)

या पथदर्शी प्रकल्‍पाला नुकतीच सुरवात केली असून, चार महिने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. सहाय्यक जिल्‍हाधिकारी तथा प्रकल्‍प अधिकारी जितीन रहमान यांच्‍या मार्गदर्शनाखाली संस्‍थेचे संचालक अभिषाल वाघ हे या प्रकल्‍पासाठी समन्‍वय साधत आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची भीती वाटते. स्‍थानिक पातळीवर विद्यार्थ्यांचा आत्‍मविश्‍वास वाढविण्याचा प्रयत्‍न शिक्षक करतात.

त्‍यांच्‍या या प्रयत्‍नांना पाठबळ देताना ‘संपूर्ण’ प्रकल्‍पांतर्गत इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्‍या विद्यार्थ्यांचा विज्ञान विषयाचा पाया भक्‍कम केला जातो आहे. तसेच स्‍पर्धेच्‍या काळात विद्यार्थ्यांनी टिकाव धरावा, यासाठी त्‍यांचा व्यक्तिमत्त्व विकास साधला जातो आहे. त्‍यांना संभाषणकौशल्‍ये, राहणीमान व इतर बाबींसंदर्भात मार्गदर्शन केले जाते आहे. (latest marathi news)

Ongoing guidance to students throughout the project.
Nashik News : पानवेली काढण्यासाठी प्रशासनाची लगबग; गोदापात्रात दीर्घ प्रतीक्षेनंतर विसर्ग

यासोबत विद्यार्थ्यांनी त्‍यांच्‍या आयुष्यात चांगली कामगिरी करावी, या उद्देशाने करिअरविषयक मार्गदर्शनदेखील उपलब्‍ध केले जाते आहे. यामध्ये करिअरचे विभिन्न पर्याय व त्‍यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, महत्त्वाचे टप्‍पे आदींची माहिती दिली जाते आहे.

स्‍थानिक सुशिक्षित युवकांना रोजगार

उपक्रमाविषयी माहिती देताना अभिषाल वाघ म्‍हणाले, प्रोजेक्‍ट ‘संपूर्ण’च्‍या माध्यमातून शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो आहे. त्‍यासाठी स्‍थानिक सुशिक्षित युवकांच्‍या सहाय्यतेने विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जाते आहे. यामुळे रोजगारनिर्मितीसह विद्यार्थ्यांचा विकास, असे दोन्‍ही उद्देश साधले आहेत.

Ongoing guidance to students throughout the project.
Nashik News : ओझरला 27 नळकनेक्शन खंडित! नगरपरिषदेची थकबाकीदारांवर कारवाई; करवसुली मोहीम जोरात

पथदर्शी प्रकल्‍पाचा कालावधी पूर्ण झाल्‍यानंतर त्‍याचे सकारात्‍मक परिणाम उमटतील, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला आहे. प्रकल्‍पासाठी सहाय्यक प्रकल्‍प अधिकारी केतन पवार, नियोजन अधिकारी नितीन पाटील, लिपिक कचवे यांच्‍यासह प्रकल्‍पासाठी रुपल गुजराथी, शीतल आहिरे यांचे सहकार्य लाभते आहे.

...या आश्रमशाळांचा उपक्रमात समावेश

प्रकल्‍पात समाविष्ट केलेल्‍या ३९ शासकीय आश्रमशाळांमध्ये नाशिक, त्र्यंबकेश्‍वर, पेठ, सिन्नर, दिंडोरी, इगतपुरी या तालुक्यांतील आश्रमशाळांचा समावेश आहे. नियमित अध्ययनाच्‍या पलीकडे जाऊन ३० स्‍वयंसेवकांचे पथक प्रत्‍येक शाळेत आठवड्याचे चार दिवस विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत.

''शहरी भागातील विद्यार्थ्यांच्‍या तुलनेत दुर्गम भागात विद्यार्थ्यांना मर्यादित संधी उपलब्‍ध असतात. शालेय जीवनात विद्यार्थ्यांचा आत्‍मविश्‍वास वाढल्‍यास ते उत्तम करिअर घडवतील. नियमित शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचा सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी ‘संपूर्ण’ प्रकल्‍प महत्त्वाची भूमिका बजावेल.''- जितीन रहमान, प्रकल्‍प अधिकारी, नाशिक

Ongoing guidance to students throughout the project.
Nashik News : विधी संघर्षीत मुलाने बालकाला पाण्यात फेकले; खेळतानाची घटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()