Nashik News : शालाबाह्य मुलांना प्रवाहात आणा; शिक्षणाधिकारी पाटील यांचे महापालिका शिक्षकांना आवाहन

Nashik News : विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी सर्व शिक्षकांची असल्याचे मत महापालिकेचे शिक्षणाधिकारी बी.टी. पाटील यांनी व्यक्त केले.
Education Officer BT Patil while guiding the teachers of the Municipal Corporation
Education Officer BT Patil while guiding the teachers of the Municipal Corporationesakal
Updated on

Nashik News : शालाबाह्य मुला- मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावे, तसेच महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढतं असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती शंभर टक्के ठेवणे आवशक्य आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी सर्व शिक्षकांची असल्याचे मत महापालिकेचे शिक्षणाधिकारी बी.टी. पाटील यांनी व्यक्त केले. (all teachers have responsibility to provide quality education to students)

महापालिकेच्या शाळा सुरू होण्याच्या पार्श्‍वभूमीवर शिक्षकांसाठी शाळापूर्व तयारी कार्यशाळा महाकवी कालिदास कलामंदिरात झाली. या वेळी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यशाळेस महापालिकेचे ८४० शिक्षक उपस्थित होते. कार्यशाळेत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून करावयाची विविध कामांची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी, याबाबत माहिती श्री. पाटील यांनी दिली.

मागील शैक्षणिक वर्षात मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात नाशिक महापालिकेच्या चार शाळांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. चालु शैक्षणिक वर्षातदेखील दहा ते पंधरा शाळांना पुरस्कार मिळावे, अशी अपेक्षा श्री. पाटील यांनी व्यक्त केली. शिक्षक हा समाजाला दिशा देणारा घटक आहे.

समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत, मुलांपर्यंत शिक्षणाची संधी मिळवून देण्याचे कार्य मनापासून करावे. शाळांमध्ये विविध सहशालेय उपक्रम राबवावे, शिक्षक म्हणून आपली जबाबदारी प्रामाणिक पणे पार पाडावी. महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्याच्या सूचना दिल्या. शिक्षकांनी ताणतणावात न राहता आनंदी वातावरणात एकदिलाने काम करावे. सहकाऱ्यांना प्रेरित करावे.

स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन, नियोजन करून विद्यार्थ्यांना पुढील दिशा द्यावी. विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित करण्याचे आवाहन श्री. पाटील यांनी केले. प्रास्ताविक बाळासाहेब कडलग यांनी केले. सुनील खेलुकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रारंभी शाळा क्रमांक २० चे शिक्षक रत्नेश चौधरी यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. (latest marathi news)

Education Officer BT Patil while guiding the teachers of the Municipal Corporation
Nashik News : ‘जलसंपदा’ला पाणीपट्टी रक्कम देण्यास नकार! उलट 23 कोटींच्या अनुदानाच्या परताव्याची मागणी

गतीसाठी स्मार्ट स्कूल

महापालिकेच्या शाळांचे रूपांतर स्मार्ट स्कूलमध्ये झाले आहे. शिक्षणाला गती देण्यासाठी, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी स्मार्ट शाळेचा उपयोग होणार आहे. येत्या काळात सर्वच वर्गातील स्मार्ट बोर्ड चालू होणार असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. समस्या सोडविण्याचे कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन या वेळी शिक्षणाधिकारी पाटील यांनी केले. गोपाळ बैरागी यांनी मार्गदर्शन केले.

हजेरीसाठी सेल्फी

महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांनी वेळ पाळण्याचे आवाहन करताना या शैक्षणिक वर्षापासून सेल्फी व थम पद्धती अवलंबिली जाणार आहे. महापालिकेच्या शिक्षकांचे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न प्राधान्याने सोडविल्याचे सांगताना श्री. पाटील यांनी शिक्षकांनी पूर्ण वेळ शाळेच्या कामात लक्ष घालण्याचे आवाहन केले.

Education Officer BT Patil while guiding the teachers of the Municipal Corporation
Nashik Monsoon News : मनमाडला दुसऱ्या दिवशीही मुसळधार; पानेवाडी-आव्हाड वस्ती रस्ता गेला वाहून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.