अंबासन : गावात गॅस्ट्रोसदृश आजाराचे दोनहून अधिक रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने याची दखल घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची तपासणी करून उपचार सुरू केले आहेत. रात्रभर सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून काही रुग्ण नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात रेफर केले. नाशिक येथील आरोग्य विभागाने धाव घेत दिवसभर तळ ठोकत नागरिकांची तपासणी करीत उपचार केले. (gastro like patient at Ambasan)