Nashik Monsoon : नार-पार, तान-मान, अंबिका नद्यांना पूर; सुरगाणा तालुक्यात धुव्वाधार

Nashik Monsoon : तालुक्यात शनिवारी (ता. ३) सकाळपासूनच पावसाने जोर धरला असून, धुव्वाधार बॅटींग सुरु आहे.
The flood water from the Kumbharchond river, a tributary of Ambike here, is flowing on the road.
The flood water from the Kumbharchond river, a tributary of Ambike here, is flowing on the road.esakal
Updated on

Nashik Monsoon : तालुक्यात शनिवारी (ता. ३) सकाळपासूनच पावसाने जोर धरला असून, धुव्वाधार बॅटींग सुरु आहे. यामुळे पिंपळसोंड परिसरात वीज गायब झाली असून, अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. रात्री-अपरात्री घराबाहेर पडणेदेखील मुश्किल झाले आहे. साप, विंचू, वन्यप्राण्यांची धास्ती वाढली आहे. यामध्ये तालुक्यातील नदी-नाले, ओहळ यांना पूर आल्याने अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. ( Ambika river flood heavy rain in Surgana taluka )

तर अनेक रस्त्यावर केवळ पाईप टाकलेल्या मोऱ्यांची फरशी असलेल्या ठिकाणी पुराचे पाणी जात असल्याने शेतात, बाहेरगावी कामानिमित्त गेलेले नागरिक अडकून पडले आहेत. यामध्ये सीमावर्ती भागातील पिंपळसोंड गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. खुंटविहीर जवळील उंबरपाडा (पि) येथील नागरिक शेती कामानिमित्त पिंपळसोंड येथे गेले होते. पंधरा ते वीस नागरिक गावाजवळील फरशीवरुन पुराचे पाणी वाहत असल्याने अंबिकेची उपनदी कुंभारचोंड ओहोळच्या पलीकडे अडकून पडतात.

उंबरपाडा हे गाव नदीपासून हाकेच्या अंतरावर असून, घरी येता येत नाही. एका शेतकऱ्याच्या बैलांनी पुरात उड्या मारुन नदी पार केली. तर शेतकरी मात्र नदीकाठावर अडकून पडला आहे. या शेतकऱ्यासह पंधरा ते वीस जण काठावर अडकून पडले होते. काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली. कुंभारचोंड नदीला धुकट्या डोंगराचा तीव्र उताराचा भाग असल्याने पुराचे पाणी तीव्र वेगाने वाहत आहे. दरम्यान, आरोग्याची कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्याने नागरीक राम भरोसे आहेत. (latest marathi news)

The flood water from the Kumbharchond river, a tributary of Ambike here, is flowing on the road.
Nashik Monsoon : पावसाचा जोर जिल्ह्यात कमी

पिंपळसोंड गावाला पुल बांधावा, अशी मागणी शिवराम चौधरी, मणिराम चौधरी, तुळशीराम खोटरे, सोन्या बागुल, नारायण गावित, देवराम महाले, मोतीराम चौधरी यांनी केली आहे. तर दुसरीकडे बाऱ्हे भागातील आंबुपाडा(बे) येथील वाकी नदीला पूर आल्याने आंबुपाडा, जांभुळपाडा, कोटंबी, मोधळपाडा, खिरमाणी, कळमणे या गावांचा बाऱ्हे भागाशी व तालुक्याशी संपर्क तुटला आहे.

तर आश्रमशाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गैरसोय होत आहे. सरपंच भाऊ भोंडवे, विलास भडांगे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश गांगोडे, माधव वाघमारे, चंदर चौधरी, यादव जाधव, जगदीश पवार, युवराज गवळी, नंदराज भोंडवे, नामदेव जाधव, प्रकाश गावित, परशराम गावित, विलास गावित, दतू वाघमारे यांनी पुलाची मागणी केली आहे.

''पिंपळसोंड गाव अतिदुर्गम भागातील गुजरात सिमेवरील दुर्लक्षित गाव आहे. या गावात आरोग्य, पिण्याचे पाणी, वीज, दळणवळण या मुलभूत सुविधा अद्याप उपलब्ध झालेल्या नाहीत. पंधरा वर्षापूर्वी पाईपची मोरी बांधली आहे. पुराचे पाणी येत असल्याने नदीच्या दोन्ही काठावर अडकून पडावे लागते. अनेक वर्षांपासून पुलाची मागणी करतोय. आजी-माजी लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतात.''- शिवराम चौधरी, माजी सैनिक, पिंपळसोंड

The flood water from the Kumbharchond river, a tributary of Ambike here, is flowing on the road.
Nashik Monsoon Season : समाधानकारक पावसामुळे शेतमजुरांना रोजगार! मालेगाव तालुक्यात निंदणी, खुरपणी, फवारणीची लगबग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.