Nashik News : सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी जनजागृती पर फलकांची मात्रा

Nashik News : या फलकावरील मांडण्यात आलेल्या सूचनाचे तंतोतंत पालन केल्यास सोनसाखळी चोरीच्या घटना कमी होतील, अशी चर्चा या निमित्ताने नागरिकांमध्ये सुरू आहे.
Boards
Boardsesakal
Updated on

पंचवटी : नाशिक शहरात सध्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरात रोज कुठल्या ना कुठल्या भागात सोनसाखळी चोरीची घटना होत असते. पोलिस प्रशासनाने एक पाऊल पुढे उचलत पोलिस ठाणे हद्दीत जनजागृती पर फलक लावण्यात आले आहेत. या फलकावरील मांडण्यात आलेल्या सूचनाचे तंतोतंत पालन केल्यास सोनसाखळी चोरीच्या घटना कमी होतील, अशी चर्चा या निमित्ताने नागरिकांमध्ये सुरू आहे. (Amount of awareness boards to prevent incidents of gold chain theft)

नाशिक शहराचा विकास झपाट्याने होत चालला आहे. शहराचा विस्तार होत चालला आहे, आगामी काळात शहर सीमेत वाढ होणार आहे. नाशिक शहर पोलिस चार विभाग आहेत, यात पंचवटी विभाग १ , सरकारवाडा विभाग २, अंबड विभाग ३ नाशिकरोड ४ आहेत. पंचवटी विभागात पंचवटी ,आडगाव, म्हसरूळ पोलिस ठाणे आहेत.

सरकारवाडा विभागात सरकारवाडा, गंगापूर, भद्रकाली पोलिस ठाणे आहेत. अंबड विभागात अंबड, इंदिरानगर, सातपूर, चुंचाळे नाशिकरोड विभागात नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प पोलिस ठाणे आहेत. शहरात रोज कुठल्या ना कुठल्या भागात सोनसाखळी चोरीची घटना घडत असते.

यात चोरटे नवं नवीन शक्कल लढवित सोनसाखळी चोरी करत असतात. या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसानी देखील आता एक पाऊल पुढे टाकले आहे. म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीत जागोजाग " सोनसाखळी चोरांपासून सावधान " अश्या आशयाचे जनजागृती पर फलक लावण्यात आले आहेत. (latest marathi news)

Boards
Gondia : नवेगावबांध गोठणगाव मार्गावरील पूल खचला; एसटी बसगाड्यासह संपूर्ण वाहतूक बंद

या फलकावर गळ्याभोवती पदर किंवा ओढणी गुंडाळूत सोनसाखळी झाकून घ्या, रस्त्यावरून चालताना मोबाईलवर बोलू नका,अधक प्रकाश असलेल्या ठिकाणी तसेच विरळ रहदारीचे ठिकाणी सावध रहा, अनोळखी व्यक्तीनी पत्ता विचारल्यास त्यांचेशी बोलत बसू नका, दुचाकी स्वाराचा वाचत संशय आल्यास त्याचे दुचाकी क्रमांक घेवून डायल ११२ ला कळवा, अशी माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. या मार्गदर्शनपर फलकावरील सूचनांचे पालन महिलांनी घराबाहेर बाहेर पडताना केल्यास सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा बसेल असे मत सर्वसामान्य नागरिकांना कडून केले जात आहे.

सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेत्यांनी घ्यावा पुढाकार

नाशिक शहरात अनेक राजकीय नेते कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते यांचे वाढदिवसानिमित्त शहर परिसरात शुभेच्छांचे फलक झळकत असतात. याच राजकीय नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजभान ठेवत आपल्या प्रभागात आपल्या मतदारसंघात जागोजागी असे सूचना व मार्गदर्शन तर फलक लावावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. सामाजिक दायित्व म्हणून किती राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते पुढाकार घेत स्वयम् स्फूर्तीने फलक लावतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Boards
Manipur Violence: शांतता कराराचे 24 तासांत वाजले बारा! मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार, अनेक घरांची जाळपोळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.