इंदिरानगर : ऐन उन्हाळ्यात वीजपुरवठ्याचा इंदिरानगर- वडाळा भागात खेळखंडोबा झाल्याने बुधवारी (ता. २२) संतप्त नागरिकांनी शिवाजीवाडी येथील उपकेंद्रावर दगडफेक केली. रात्री नऊ वाजता खंडित झालेला वीजपुरवठा तब्बल सोळा तासांनी म्हणजेच दुपारी १ वाजता पर्यायी व्यवस्था वापरून टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आला. (Nashik Angry citizens pelted stones at substation at Shivaji Wadi)
भयंकर उकाड्याने वडाळा, खोडेनगर, अशोका मार्ग, विधातेनगर, शिवाजीवाडी, भारतनगर आदी भागातील नागरिकांना अक्षरशः रात्र जागून काढावी लागली. अनेक ठिकाणी तर लहान मुलांसह नागरिक रस्त्यावर येऊन बसले होते. वीज कंपनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार द्वारका उपविभागाची ग्राहक क्षमता साधारण ७० हजार असताना दीड लाख ग्राहकांचा भार येथील शिवाजीवाडी, टाकळी, इंदिरानगर उपकेंद्रांवर पडत आहे.
दर महिन्याला ७०० ते ८०० नवीन जोडण्या द्याव्या लागत आहेत. त्यामुळे वारंवार क्षमतेपेक्षा जास्त भार होत असल्याने ३३ केव्ही मुख्य वाहिन्या नादुरुस्त होत आहेत. सध्या केलेली दुरुस्ती त्यामुळे किती वेळ टिकेल याची कुणालाच शाश्वती नाही. वर्षापासून वीज कंपनी वडाळा येथील सर्वे क्रमांक ८२ मधील आरोग्य केंद्र शेजारील आणि वासननगर भागातील जगन्नाथ मंदिराशेजारी असलेल्या महापालिकेच्या जागांची उपकेंद्रासाठी मागणी करत आहेत.
मात्र या जागा मिळत मिळत नसल्याने हजारो कुटुंबीयांना मोठे हाल सोसावे लागत आहेत. २०१२-१३ ला उभारलेल्या ट्रान्सफॉर्मर इन्फ्रास्ट्रक्चर वरच आजदेखील सर्व पुरवठा सुरू असल्याने वारंवार ही यंत्रणा कोलमडत आहे. द्वारका उपकेंद्रातूनच सारूळ औद्योगिक वसाहत आणि अंबड औद्योगिक वसाहतीमधील काही कंपन्यांना वीजपुरवठा केला जातो. साधारण दहा एमव्हीए क्षमतेच्या उपकेंद्रावर तीस हजार घरगुती ग्राहक आणि पाच हजार कंपनीची गरज भागवली जाते. (latest marathi news)
सध्या शिवाजी वाडी उपकेंद्राची क्षमता १०, तर पाथर्डीची क्षमता २० एमव्हीए आहे. एवढ्या तोकड्या पुरवठ्यावर पाथर्डी आणि पुढे वडनेरपर्यंतचा संपूर्ण भाग सांभाळला जात आहे. किमान २० एमव्हीए क्षमतेचे उपकेंद्र उभारणीसाठी सहा महिने वेळ लागतो. या क्षमतेची दोन उपकेंद्रे उभारले तर या संपूर्ण परिसराची वीज मागणी पुरवली जाऊ शकते. विजेचा तुटवडा सध्या अंबड आणि उपनगर उपकेंद्रातून भागविला जात आहे.
टाकळी उपकेंद्र मोठी क्षमता असलेले आहे, मात्र येथून येवढ्या वर्षात इंदिरानगर आणि शिवाजीवाडीपर्यंत थेट केबलच टाकलेल्या नाहीत. त्यामुळे त्याचा उपयोग होऊ शकत नाही. बुधवारी शिवाजी वाडी आणि गोविंदनगर उपकेंद्राच्या मुख्य वाहिनी द्वारका भागात आयशर ट्रॅक्टर हाऊस, दुसऱ्या बाजूला असणाऱ्या ट्रॅव्हल्स थांबा आणि द्वारका चौकातील बस थांबा या तीन ठिकाणी नादुरुस्त झाल्या.
१५ कर्मचारी रात्रभर जागून
रात्री नऊपासूनच नाशिक शहर विभाग दोनचे कार्यकारी अभियंता भांबर, विभाग एकचे वाडे, द्वारका विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता एन. एम. सोनवणे, सहाय्यक अभियंता मंगेश सोनगिरे, राणेनगरचे सहाय्यक अभियंता मनोज कातकडे, विशाल निंबाळकर, सिडकोचे पाटील या अधिकाऱ्यांसह १५ कर्मचारी रात्रभर जागून होते.
त्यांच्यासोबत खोदकामासाठी १२ कामगार रात्रभर जागले. १६ तासांच्या नंतर सलग १९ तास काम करून गुरुवारी (ता.२३) दुपारी चार वाजता चाचणी घेऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. नादुरुस्त केबलचे काम मात्र सुरूच होते. ते झाल्यानंतर त्याची चाचणी घेऊन त्यावर वीजपुरवठा करण्यात येईल असे सांगण्यात आले. पायाभूत सुविधाच तोकड्या असल्याने हे कर्मचारी हैराण झाले असून, त्यांना आता नागरिकांचा रोषदेखील सांभाळावा लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.