Nashik News : बत्तीगुलमुळे त्रस्त ग्रामस्थ रात्री घुसले वीज केंद्रात; आक्रमक ग्रामस्थांच्या ठिय्यानंतर लागली वीज

Nashik News : गावात वीज उपकेंद्र आहे मात्र तरीही गाव बारा बारा तास अंधारात राहत असल्याने नागरिक त्रस्त झाले.
Sub Sarpanch Santosh Gunjal, Bhausaheb Rokade while giving a statement at the office of the power distribution company at Chichondi Budruk at 10 pm.
Sub Sarpanch Santosh Gunjal, Bhausaheb Rokade while giving a statement at the office of the power distribution company at Chichondi Budruk at 10 pm.esakal
Updated on

Nashik News : गावात वीज उपकेंद्र आहे मात्र तरीही गाव बारा बारा तास अंधारात राहत असल्याने नागरिक त्रस्त झाले. चिचोंडी बुद्रूक व चिचोंडी खुर्द या गावांमध्ये गेल्या तीन दिवसापासून रात्री वीज पुरवठा खंडित असल्याने संतप्त नागरिकांनी रात्री दहाला येथील वीज उपकेंद्र गाठून रात्रपाळीला काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारून वीज पुरवठा खंडित का केला जातो याचा जाब विचारला. (angry citizens protest at power station)

तेथे ड्यूटीवर असलेल्या ऑपरेटर श्री.मेतकर यांनी वरिष्ठांशी बोलून ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. दरम्यान अल्प पावसाने वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार चिचोंडी सबस्टेशन मधून सातत्याने होतात यामुळे संतप्त चिचोंडीकरांनी रात्री दहाला महावितरण कंपनी कार्यालयात जाऊन निवेदन देत नाराजी व्यक्त केली.

रुग्णांची अस्वस्थता

रात्री उकाड्याने त्रस्त नागरिक, लहान मुले दम्याने त्रस्त तसेच बीपीचा त्रास रुग्णात खूप अस्वस्थता वाढली. त्यांच्या जिवाला धोका संभवतो. त्यामुळे निमगाव फीडर अंतर्गत ही अडचण दूर करावी अशी मागणी नागरिकांनी केली. उपसरपंच संतोष गुंजाळ, बाबासाहेब शिंदे, भाऊसाहेब रोकडे, माजी उपसरपंच मच्छिंद्र मढवई. (latest marathi news)

Sub Sarpanch Santosh Gunjal, Bhausaheb Rokade while giving a statement at the office of the power distribution company at Chichondi Budruk at 10 pm.
Nashik Teacher Constituency: शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढत; नाशिक विभागातील 5 जिल्ह्यांत 69 हजार मतदार बजावणार हक्क

प्रमोद पाटील, काँग्रेस आय चे तालुका सरचिटणीस सुखदेव मढवई, औदुंबर मढवई, मिलिंद गुंजाळ, अरुण गुंजाळ, अश्फाक तांबोळी, समाधान सूर्यवंशी, बापू मढवई, कय्युम तांबोळी, सचिन पवार, रविंद्र पवार, महेंद्र गुंजाळ, श्रावण मढवई, खुशाल जाधव, बबन भाकरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. नागरिकांच्या उग्र आंदोलनानंतर वीज पुरवठा सुरु झाला.

" जोराचा पाऊस नाही, जोराचा वारा नाही तरीही रात्र रात्र वीज पुरवठा वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे बंद असतो चिचोंडी गावासाठी स्वतंत्र फिडर द्यावे व कायमस्वरूपी वीज द्यावी. अशी मागणी करून देखील अद्याप ती पूर्ण झाली नाही." - मिलिंद गुंजाळ, सामाजिक कार्यकर्ते, चिचोंडी

Sub Sarpanch Santosh Gunjal, Bhausaheb Rokade while giving a statement at the office of the power distribution company at Chichondi Budruk at 10 pm.
Nashik Teacher Constituency : शिक्षक मतदार आज बजावणार हक्क; जिल्ह्यात 25 हजार 302 मतदारांसाठी 29 मतदान केंद्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.