Nashik Animal News : देवळालीत चोरट्यांकडून जनावरांची चोरी, पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर घडला प्रकार

Animal Smugling news
Animal Smugling newsesakal
Updated on

Nashik News : राज्यातील भाजप शिवसेनेचे सरकार राज्यात कोठेही गो हत्या होणार नाही याची पुरेपूर काळजी घेत असताना देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या व भर रस्त्यावर तीन व्यक्ती जनावर कारमध्ये कोंबून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे गोवंश संरक्षण समिती तसेच हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत.

या गुन्हेगारांचा त्वरित शोध घेऊन कारवाईची मागणी कार्यकर्त्यांनी केली. (Nashik Animal News Stealing of animals by thieves in Deolali incident happened just call away from police station Nashik News)

Animal Smugling news
Nashik News: महामार्गावरील CCTVचा नाशिककरांना फायदा! कसारा ते नाशिक मार्गावर कॅमेरे बसविण्याची मागणी

देवळाली कॅम्प परिसरात यापूर्वी देखील गाईंची तस्करी होत असल्याचे प्रकार उघड झाल्यानंतर 22 मेस पहाटे चार ते पाच या दरम्यान नविन बस स्थानकाजवळ असलेल्या चौकात एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये दोन ते तीन जण एक जनावर बळजबरी कोंबत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

याबाबत अनेक हिंदुत्ववादी संघटना व गोरक्षक समितीचे कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त करत घडलेल्या प्रकाराचा निषेध करत तातडीने या कार मालकाला शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. पोलीस स्टेशन लगतच असे प्रकार होत असल्यामुळे या व्हिडीओ ची जोरदार चर्चा आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Animal Smugling news
Nashik Accident News : 3 वाहनांचा विचित्र अपघात; दोघे जखमी

दरम्यान पोलिसांना हा प्रकार समजताच त्यांनी कारचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच गोवंश तस्करांनी भरधाव कार पळवून धूम ठोकल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

याप्रकरणी पोलिसांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओ वरून तीन अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एन एस भुजबळ करीत आहेत .

Animal Smugling news
Crime News : महावितरणच्या भरारी पथकासह पोलिसांना मारहाण; गावकऱ्यांनी गाडीही फोडली

देवळाली कॅम्प परीसरात मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरे आहेत,ते या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने खाजगी व्यक्तीस ठेका दिला आहे, मात्र ठेकेदार कुठले प्रकारची कारवाई करत नसल्याने मोकाट जनावरांचे मालक पण जबाबदार आहेत.

Animal Smugling news
Nandurbar Crime News : Travelsमधून शेतकऱ्याचे पैसे चोरणारा आंतरराज्यीय गुन्हेगार रोकडसह ताब्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.