Nashik News : पशू, कुक्कुटखाद्याची होणार तपासणी; बोगसगिरीला बसणार आळा

Nashik : कुक्कुटपालन व्यावसायिकांना विविध कंपन्यांकडून विक्री करण्यात येणाऱ्या पशू व कुक्कुट खाद्याची प्रयोगशाळेत नियमित तपासणी केली जाणार आहे.
Department of Animal Husbandry
Department of Animal Husbandryesakal
Updated on

Nashik News : राज्यातील दूध उत्पादक शेतकरी, पशुपालक, कुक्कुटपालन व्यावसायिकांना विविध कंपन्यांकडून विक्री करण्यात येणाऱ्या पशू व कुक्कुट खाद्याची प्रयोगशाळेत नियमित तपासणी केली जाणार आहे. याबाबत राज्य शासनाने निर्देश काढले आहेत. तपासणीमध्ये खाद्यात काही भेसळ आढळल्यास संबंधित कंपनीवर कारवाई होणार आहे. या प्रकारामुळे कंपन्यांच्या मनमानी कारभाराला आळा बसणार आहे. (Animal poultry feed will be checked Bossgiri will be blocked )

राज्यातील दूध उत्पादक शेतकरी, पशुपालक, कुक्कुटपालन व्यावसायिकांना गुणवत्तापूर्ण पशुखाद्य उपलब्ध होण्यासाठी पशुसंवर्धन विभाग ‘अॅक्शन मोड’वर आला आहे. त्या अनुषंगाने राज्यातील पशुधनास गुणवत्तापूर्ण पशुखाद्य उपलब्ध होण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. आता या पशुखाद्याची नियमित तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कंपन्यांच्या बोगसगिरीला चाप बसणार आहे. हा आदेश काढल्यामुळे पशुखाद्य कंपन्यांना गुणवत्ताधारक खाद्याचेच उत्पादन करावे लागणार आहे. (latest marathi news)

Department of Animal Husbandry
Nashik News : दीप अमावास्येचे औचित्य साधत खवय्यांचा ‘नॉनव्हेज’वर ताव

पशुखाद्याच्या पॅकिंग बॅगवर पशुखाद्यातील अन्नघटकाचे प्रमाणे ठळकपणे नमूद करावे लागणार आहे. कुक्कुटपालन व्यवसायामध्ये साधारणपणे ६५ ते ७० टक्के खर्च खाद्याचा असतो. त्यामुळे खाद्याची गुणवत्ता ही कुक्कुटपालन व्यवसायाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक असतो. ‘फूड्स सेफ्टी अॅन्ड स्टॅण्डडर्स ऑफ इंडिया’ या संस्थेने राज्यात आयएसआय मार्क पशुखाद्याचे उत्पादन व विक्री करणे बंधनकारक केले आहे.

राज्यस्तरीय समिती स्थापन

पशु व्यावसायिकांना गुणवत्तापूर्ण खाद्य मिळावे, यासाठी पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. राज्यातील उत्पादित व विक्री होणाऱ्या पशू-पक्षी खाद्याच्या गुणवत्तेबाबत आणि किफायतशीर दरांबाबत सर्वंकष चर्चा करून तसेच पशुपालकांकडून प्राप्त होणाऱ्या सूचना त्या अनुषंगाने खाद्य उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी आणि केंद्र, राज्य शासनाच्या विभागांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून समन्वयाने उपाययोजना केल्या जाणार आहेत.

Department of Animal Husbandry
Nashik News : हयात नसलेल्यांच्या नावे भूसंपादनाची नोटीस; रोहिले ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.