Nashik News : गाव तेथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आणि घर तेथे सेवेकरी हे अभियान राबविण्यासाठी सर्व सेवेकऱ्यांनी सक्रिय व्हावे. समर्थ कुटुंब, समाज आणि राष्ट्र घडवायचे असेल तर प्रत्येक घरात स्वामीसेवा पोचणे गरजेचे आहे म्हणूनच निर्व्यसनी, आदर्श, सुसंस्कृत, सशक्त कुटुंब, समाज, राष्ट्र उभे करण्यासाठी आपण सर्वांनी आजपासूनच कामाला लागावे असे आवाहन गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केले. याप्रसंगी चंद्रकांतदादा मोरे, नितीन मोरे, आबासाहेब मोरे, उपस्थित होते. (Commencement of Samarth Sevamarg Guru Poornima utsav)
त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात आषाढी एकादशीपासून गुरुपौर्णिमा उत्सवाचा प्रारंभ झाला. या निमित्ताने हजारो सेवेकरी, वारकऱ्यांशी हितगुज साधताना गुरुमाऊलींनी मार्गदर्शन करत आवाहन केले.
रविवारी (ता.२१) गुरुपौर्णिमा आहे. परंतू, सेवामार्गाचा वाढता व्याप लक्षात घेता एकाच दिवशी देशभरातील महिला पुरुष सेवेकऱ्यांची त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी येथे गर्दी होऊन नियोजनाचा ताण नको म्हणून २१ जुलै २०२४ पर्यंत जिल्हावार विभागणी करून रोज ठराविक संख्येने सेवेकरी दिंडोरी, त्र्यंबकमध्ये येतील अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. गाणगापूर, पीठापूर, कुरवपूर, नृसिंहवाडीसह देश आणि विदेशातील समर्थ केंद्रावर होणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाचे नियोजन करण्यात आले.
गुरुमाऊली म्हणाले, की जुलै महिना संपत आला तरी पावसाने दडी मारल्याने सेवेकरी पर्जन्य सुक्ताच्या माध्यमातून पर्जन्य राजास विनंती करतच आहे. पण आता गावागावात ग्रामस्थांनी मंदिरात एकत्र येऊन पावसासाठी साकडे घालावे तरच पर्जन्यराजा प्रसन्न होईल असे सांगितले. (latest marathi news)
अब्जचंडी व इतर आध्यात्मिक सेवांबरोबरच एक कोटी वृक्षारोपण, स्वच्छता आरोग्य अभियान, मराठी अस्मिता भारतीय संस्कृती, गर्भ, मूल्य, बाल, युवासंस्कार, सामुदायिक विवाह, सेंद्रिय शेती, ग्रामभियान, प्रश्नोत्तरे अशा विविध समजपयोगी कामांचा आढावा घेऊन मार्गदर्शन गुरुमाऊलींनी केले.
गुरुपौर्णिमा शुभारंभ प्रसंगी नेपाळसह इतर देशांमधूनही महिला पुरुष सेवेकरी उपस्थित होते. सकाळी श्री स्वामी समर्थ महाराज अभिषेक व महापूजा चंद्रकांत दादा मोरे यांचे हस्ते झाली. त्यानंतर दिवसभर गुरुपीठ परिसरात सेवेकरी व वारकऱ्यांची मांदियाळी होती.
वारीला जाण्याचे पुण्य मोठे
आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी, भाविक वारीतून आज विठ्ठल, पांडुरंग दर्शनासाठी पंढरीत हजर होत आहेत. वारीत जाण्याचं पुण्य, अनुभती मोठीच आहे. पण पांडुरंगा बरोबरच पुंडलिकालाही समजून घ्यायला हवे असा मोलाचा सल्लाही गुरुमाऊली यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.