Nashik News : ‘ही मैत्री विचारांची’ डिजिटल शेतकरी समूहाचा वर्धापनदिन; राज्यातील 4 हजार उपक्रमशील शेतकऱ्यांचा सहभाग

Nashik : ही मैत्री विचारांची’ या समूह शेतकऱ्यांच्या क्लब हाऊसचा तृतीय वर्धापनदिन पुणे जिल्ह्यातील यवत (ता. दौंड) येथे शनिवारी (ता. २५) उत्साहात साजरा करण्यात आला.
Honorable while releasing the workbook 'Changes in Agriculture Sector' on the occasion of the anniversary at Sheru Agro Tourism here.
Honorable while releasing the workbook 'Changes in Agriculture Sector' on the occasion of the anniversary at Sheru Agro Tourism here.esakal
Updated on

Nashik News : पारंपरिक शेती व्यवसायाला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती व्यवसायाला एका विशिष्ट उंचीवर नेऊन, प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी सोशल मीडियावर स्थापन झालेल्या ‘ही मैत्री विचारांची’ या समूह शेतकऱ्यांच्या क्लब हाऊसचा तृतीय वर्धापनदिन पुणे जिल्ह्यातील यवत (ता. दौंड) येथे शनिवारी (ता. २५) उत्साहात साजरा करण्यात आला. तंत्रज्ञानाच्या मदतीनेच शेतकऱ्यांच्या आयुष्यात परिवर्तन होऊ शकते. (Anniversary of Digital Farmer Group Participation of 4 thousand enterprising farmers )

हे विविध प्रयोग यशस्वी करून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा ग्रुप स्थापन करण्यात आला आहे. राज्यातील जवळपास चार हजार उपक्रमशील शेतकरी या माध्यमातून जोडले गेले आहेत. सर्वांनी आपापल्या परिसरात कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग सुरू केले आहेत. २०२१ मध्ये सुरू झालेल्या ऑडिओ ॲपचे डिजिटल चावडीत रूपांतर झाले. त्यामुळे राज्यातील जिज्ञासू प्रगतिशील शेतकरी एकत्र आले. सोशल मीडियाच्या क्लब हाऊस ॲपवर २४ तास चर्चेचे व्यासपीठ उघडले.

या चर्चेमध्ये पिकांची माहिती, खतांचे प्रमाण, हवामानाचा अंदाज, शेती उत्पादनाचे बाजार मूल्य, भविष्याची लागवड या विषयांवर चर्चा करतात. आवश्यकतेनुसार कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, पीकतज्ज्ञ प्रगतिशील शेतकरी या चर्चेमध्ये सहभागी होतात. अनेकदा शेतीच्या विषयांबरोबरच शेतीपूरक व्यवसाय किंवा वैयक्तिक अडचणी, शिक्षण आरोग्य या विषयांवरही शिस्तबद्ध चर्चा होतात. या समूहाने स्वतःची आचारसंहिता तयार केली आहे. वर्धापन दिनानिमित्त सर्व उपस्थित शेतकऱ्यांनी ‘आम्हाला कोणतेही अनुदान नको, सरकारी मदत नको, फक्त आमच्या शेतमालाला योग्य भाव द्या’ अशी एकमुखी मागणी केली.

Honorable while releasing the workbook 'Changes in Agriculture Sector' on the occasion of the anniversary at Sheru Agro Tourism here.
Nashik News : चाराटंचाईची धाग वाढली! सिन्नर, चांदवड, येवला, नांदगावमध्ये भीषण स्थिती; पशुपालक अडचणीत

महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषी अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. विश्‍वनाथ शिंदे, पुणे विभागीय कृषी सहसंचालक रफिक नायकवडी, ॲग्रोवनचे ज्येष्ठ कृषी पत्रकार अमित गद्रे, पुणे जिल्हा कृषी अधीक्षक संजय काचोळे, बाजारभाव अभ्यासक्रम दीपक चव्हाण, दौंड तालुका कृषी अधिकारी राहुल माने, इंडियन फार्मर्सचे सहसंस्थापक संतोष जाधव यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केले.

'‘ही मैत्री विचारांची’ शेतकऱ्यांसाठी प्लॅटफॉर्म असलेल्या या ग्रुपला आज तीन वर्षे पूर्ण झाली. मोजक्याच लोकांनी सुरू झालेल्या या ग्रुपमध्ये हजारो उपक्रमशील शेतकरी जोडले गेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे वैयक्तिक मला व परिसरातील अनेक शेतकऱ्यांना मोठा लाभ झालेला आहे. विविध पिकांच्या नवीन लागवडीची संकल्पना तरुण व जिज्ञासू शेतकरीवर्ग अंगिकारतो आहे.''- पंडित वाघ, उपक्रमशील शेतकरी, बार्डे

Honorable while releasing the workbook 'Changes in Agriculture Sector' on the occasion of the anniversary at Sheru Agro Tourism here.
Nashik News : शहरात वाहनांची तोडफोड करणाऱ्यांची दहशत; नाशिककरांमध्ये भितीचे वातावरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.