लासलगाव : निफाड तालुका द्राक्ष पंढरी म्हणून प्रसिद्ध असतानाच निफाड तालुक्यातील पालखेड येथील शेतकरी प्राध्यापक भरत बोलीज यांनी आगळावेगळा प्रयोग करून सफरचंदाची (Apple) बाग फुलविली. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या द्राक्षबागेला फाटा देऊन नवीन सफरचंदची दमदार एन्ट्री केली. (Nashik apple crop successful experiment at Niphad marathi news)
अवकाळी, गारपिटीचा दर वर्षी द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील गावांना तडाखा बसतो म्हणून काही तरी वेगळा शेतीप्रयोग करावा म्हणून निफाड तालुक्यातील पालखेड येथील शेतकरी बोलीज यांनी सफरचंदाची लागवड केली. या झाडांना फळ आल्याने हा वेगळा प्रयोग यशस्वी झाला आहे.
निफाड तालुक्यातील पालखेड येथील साहेबराव बोलीज यांचा मुलगा भरत बोलीज हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे प्राध्यापक म्हणून कामकाज करत होते. पण कोविडचा प्रादुर्भाव झाल्याने नोकरीवर गदा आल्याने आता काय करावे, असा प्रश्न उभा राहिला असता.
वडिलोपार्जित शेती करावी; पण अवकाळी, गारपिटीचा दर वर्षी तडाखा बसत असल्याने द्राक्षबागेचे नुकसान होते आणि लाखोंचा खर्च वाया जातो. मग काहीतरी वेगळा प्रयोग करावा, अशी मनात कल्पना आली. मग काय, हिमालयीन शिमला अँना या जातीचे सफरचंदाची ३० झाडे आणून मार्च २०२३ मध्ये लागवड केली. (Latest Marathi News)
आतापर्यंत शंभर रुपये एक झाड, याप्रमाणे तीन हजार रुपये खर्च आला. या झाडांवर सफरचंद आले असून, यांची हर्वेस्टिंग एप्रिल, मे महिन्यात सुरू होणार असल्याने जम्मू-काश्मीरअगोदर येथील सफरचंद बाजारात दाखल होणार असल्याचे शेतकरी भरत बोलीज यांनी सांगितले.
"सतत हवामानाचा फटका पारंपरिक पिकाला बसत असल्याने द्राक्षशेती करणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे शेती तोट्यात जात असल्याने नवीन प्रयोग म्हणून हिमालयीन शिमला अँना जातीचे सफरचंदाचे वाण लावून शेतीत नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. जास्त तापमानातही ही जात तग धरू शकते."- प्रा. भरत बोलीज, पालखेड मिरचीचे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.