Nashik News : ‘पेसा’ क्षेत्रातील 86 तलाठ्यांना नियुक्ती! शासन आदेशानंतर 3 दिवसांत कार्यवाही; जिल्ह्यात 182 नवीन तलाठी

Latest Nashik News : भरतीसंदर्भात शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तीन दिवसांत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करून त्यांना नियुक्ती आदेश जारी केला.
appointment
appointmentesakal
Updated on

Nashik News : आदिवासी क्षेत्राबाहेरील गावांसाठी ९६ तलाठ्यांना दोन टप्प्यांत नियुक्ती दिल्यानंतर गुरुवारी (ता. १०) पेसा क्षेत्रातील ८६ तलाठ्यांची मानधनावर नियुक्ती करण्यात आली. भरतीसंदर्भात शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तीन दिवसांत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करून त्यांना नियुक्ती आदेश जारी केला. (Appointment of 86 Talathis in PESA sector)

जिल्ह्यातील रिक्त १८२ तलाठी पदे भरण्यासाठी २०२२-२३ मध्ये शासनाने मंजुरी दिली. शासन स्तरावरून राबविलेल्या भरती प्रक्रियेत नाशिक जिल्ह्यात १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत लेखी परीक्षा झाली. दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावर काही उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतल्याने आदिवासी भागातील भरती रखडली.

पेसाव्यतिरिक्त म्हणजेच सर्वसाधारण क्षेत्रातील जागांसाठी पात्र ठरलेल्या तलाठ्यांना दोन टप्प्यांत सप्टेंबर २०२४ मध्ये नियुक्ती आदेश देण्यात आले. मात्र, आदिवासी क्षेत्रातील उमेदवारांचा विषय न्यायप्रविष्ट असल्याने त्याबाबत प्रशासनाला निर्णय घेणे शक्य नव्हते. मात्र, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह आदिवासी आमदारांनी मंत्रालयात या भरतीसाठी तीव्र आंदोलन केले. (latest marathi news)

appointment
Nashik News : सातबारा विभाजन चौकशी समितीच्या बैठकीत MHADA चे अधिकारी गैरहजर! पुढील बैठक 25 तारखेला

त्यामुळे राज्य शासनाला तत्काळ निर्णय घेणे भाग पडले आणि मानधन तत्त्वावर भरती करण्याचा निर्णय घेतला. या आदेशाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने ८६ तलाठ्यांना एकाच वेळी नियुक्ती आदेश दिले. यात दिंडोरी- २१, चांदवड- आठ, इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर- १६, कळवण- २५, नाशिक- ६, सटाणा- १० याप्रमाणे प्रांत कार्यालयास तलाठी नियुक्तीचे आदेश कळविले आहेत. नवनियुक्त तलाठ्यांना पुढील तीन ते सहा महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम करावे लागेल. त्यानंतर स्वतंत्र सजा अर्थात, दोन-तीन गावांचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी त्यांना देण्यात येणार आहे.

यामुळे झाला निर्णय

रखडलेल्या पेसा भरतीसाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर, बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांनी ४ ऑक्टोबरला मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या घेत आंदोलन केले. सत्तेतील आमदारांवरच ही वेळ येत असल्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढावली. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने या भरतीला न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून परवानगी दिल्याने हा प्रश्‍न मार्गी लागला आहे.

appointment
Nashik NMC News : निवडणुकीच्या तोंडावर शहरात ‘होर्डिंग्ज वॉर’! महापालिकेचे दुर्लक्ष; ‘आय साइट’ नसल्याने अपघाताची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.