Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या पदभरतीतील सात संवर्गांचे नियुक्ती आदेश बुधवारी (ता. ४) निर्गमित करण्यात आले. यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक, लघुलेखक (उच्च श्रेणी), कनिष्ठ सहाय्यक (लेखा), कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ आरेखक, विस्ताराधिकारी (शिक्षण) या पदांचे नियुक्ती आदेश प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांच्या हस्ते देण्यात आले. ग्रामविकास विभागाच्या मान्यतेने नाशिक जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गांसाठी प्रसिद्ध जाहिरातीनुसार जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा घेण्यात आल्या होत्या. (Appointment order of 7 crore in Zilla Parishad recruitment distributed )