Nashik News : नाशिकरोडला अतिरिक्त सत्र अन्‌ दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालयास मंजुरी; राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब

Nashik News : राज्य मंत्रीमंडळाच्या गुरुवारी (ता १०) झालेल्या बैठकीमध्ये नाशिकरोड येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासह दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालयास मंजुरी देण्यात आली आहे.
Approval of additional session
Approval of additional sessionesakal
Updated on

नाशिक : राज्य मंत्रीमंडळाच्या गुरुवारी (ता १०) झालेल्या बैठकीमध्ये नाशिकरोड येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासह दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालयास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे नाशिकरोड व परिसर वासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, नाशिकरोडसह तुलजापूर आणि वणी (यवतमाळ) येथेही अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयास मंजुरी देण्यात आली आहे. (Approval of additional session and civil superior level court for Nashik Road was sealed in meeting of state cabinet )

येत्या आठवड्यात आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रीमंडळाची गुरुवारी (ता. १०) मंत्रालयामध्ये बैठक झाली. या बैंठकीमध्ये विविध विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. यात नाशिक रोड येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालयास मंजुरी देण्यात आली आहे. नाशिकरोड वकील संघाच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून शासनाकडे नाशिकरोड येथे अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी स्तर न्यायालय सुरू करण्याची मागणी होती. (latest marathi news )

Approval of additional session
Nashik News : कसमादेत दगडी पाट्याची क्रेझ कायम! यात्रोत्सवात पाटे, वरवंटा विक्रीसाठी दाखल

नाशिकरोडसह आसपासच्या परिसरातील दिवाणी वरिष्ठ स्तरावरील खटले मोठ्याप्रमाणात नाशिक जिल्हा न्यायालयात दाखल होत असतात. नाशिकरोड परिसरातून पक्षकारांना सातत्याने न्यायालयीन कामकाजासाठी नाशिक जिल्हा न्यायालयात जावे लागत होते. यात पक्षकारांचा वेळेच्या अपव्यय होऊन आर्थिक झळही सोसावी लागत होती. त्यामुळे नाशिक बार असोसिएशन आणि नाशिकरोड वकील संघातर्फे शासनाकडे सातत्याने मागणी केली जात होती. अखेर या मागणीला गुरूवारी (ता. १०) मंजुरी मिळाल्याने नाशिकरोड वासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

''नाशिकरोड येथे अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालय असावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला जात होता. त्यास आज मंजुरी मिळाली असून, लवकरच पुढील प्रक्रिया पार होऊन नाशिकरोड येथे अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालय सुरू होईल.''- सुदाम गायकवाड, अध्यक्ष, नाशिकरोड वकील संघ.

Approval of additional session
Nashik News : नवरात्रोत्सवात चांदवड तालुक्यात फुलली रंगबिरंगी फुलशेती!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.