Nashik News : केंद्र व राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्ह्यात आपत्ती प्रतिबंधक उपाययोजनांसाठी कामांचे प्रस्ताव मागितले. यात साधारणतः शंभर कोटी रुपयांपर्यंतच्या कामांचा अंदाज असताना प्रत्यक्षात १६६ कोटी ३५ लाखांची कामे लोकप्रतिनिधींनी सुचविली आहेत. त्यामुळे कुठल्या कामांना मंजुरी द्यायची आणि कुणाला कात्री लावायची म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व कामांना तत्त्वतः मंजुरी देत या कामांचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठविला आहे. ( Approval of Collector of 166 crore proposals for disaster relief )
आपत्ती सौम्यीकरणांतर्गत प्राधान्य क्रमानुसार जिल्ह्यासाठी १०० कोटींचा निधी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ७८९ कोटींची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. यामुळे कामांना मंजुरी देणाऱ्या समितीने ही सर्व कामे फेटाळत जिल्हाधिकारी कार्यालयास सुधारित शंभर कोटींच्या मर्यादेत कामे सुचविण्याची सूचना केली होती. आराखडा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर सादर करण्यात आला.
या समितीमध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी उपसंचालक, निवासी उपजिल्हाधिकारी, आरोग्य विभाग आदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अतिवृष्टी, पूर, भूकंप आदी नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर नैसर्गिक साधनसंपत्तीचे, तसेच नागरिकांच्या मालमत्तांचे मोठे नुकसान होत असते. भविष्यात असे नुकसान टाळण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून आपत्ती
प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी अनेक वर्षांनी निधी देण्यात येणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळविले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांच्याकडून त्यांच्या मतदारसंघातील अशा कामांची यादी मागविली. प्रत्येक आमदाराने त्यांच्या मतदारसंघातील वेगवेगळ्या यंत्रणांकडून करता येतील अशा कामांची यादी दिली आहे. (latest marathi news)
...असा आहे कामांचा तपशील
विभाग ----------------- रक्कम रुपये (लाखांत)
सार्वजनिक बांधकाम विभाग : १३६६१
नाशिक पाटबंधारे विभाग : २३०२
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा : ९ बांधकाम विभाग,
जिल्हा परिषद : ३५२
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन : ५५
पाटबंधारे विभाग : १०५
नाशिक महापालिका : १५०
एकूण १६,६३५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.