River Linking Project : वैनगंगा-नळगंगापाठोपाठ आता नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे या खोऱ्यातून १०.६४ टीएमसी पाण्याचा वापर होणार असून, तब्बल ४९ हजार ५१६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होईल. यात नाशिक जिल्ह्यातील कळवण, बागलाण, देवळा, मालेगाव या तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, हा प्रकल्प ‘कसमादे’ला वरदान ठरणार आहे. (Approval to Nar Par Girna river linking project Kasmade )