Nashik News: मक्यावरील लष्करी अळीचे 3 पध्दतीत उपाययोजना : विवेक सोनवणे; मशागत, भौतिक व रासायनिक पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन

Agriculture News : शेतकऱ्यांनी एकात्मिक व्यवस्थापनाचा वापर करून मशागत, भौतिक, जैविक व रासायनिक पद्धतीची उपाययोजना करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.
army worm on maize
army worm on maizeesakal
Updated on

Nashik News : जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, नांदगाव, देवळा व कळवण भागातील मका पिकावर नवीन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांनी एकात्मिक व्यवस्थापनाचा वापर करून मशागत, भौतिक, जैविक व रासायनिक पद्धतीची उपाययोजना करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे. (Armyworm problem solving on Maize in 3 ways Vivek Sonawane)

एकात्मिक व्यवस्थापनाच्या पद्धती

मशागत पद्धत : उन्हाळ्यात खोल नांगरट करावी. पीक फेरपालट करावी. मका घेतलेल्या पिकात भुईमूग अथवा सूर्यफूल पीक घ्यावे. सापळा पीक म्हणून मक्याचे बाजूने नेपिअर गवताची लागवड करावी. मक्यात तूर, उडीद तसेच मूग या पिकांची आंतरपीक म्हणून लागवड करावी.

भौतिक पद्धत : मका पेरणीनंतर एकरी १० ते १२ पक्षी थांबे उभारावेत. मका पानांवरील अंडीपुंज व नवजात अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. कीड सर्वेक्षणासाठी एकरी पाच कामगंध सापळे लवावेत. तसेच मोठ्या प्रमाणात नर पतंग पकडण्यासाठी एकरी ८ ते १० कामगंध सापळे लावावेत. (latest marathi news)

army worm on maize
Nandurbar Agriculture News : तळोद्यात 72 टक्के क्षेत्रावर पिकांची लागवड! पावसाने उघडीप दिल्याने पेरणीसह शेतीकामांना वेग

जैविक पद्धत : मका पिकात १५०० पी.पी.एम. ॲझाडिरॅक्टीन ५० मिली किंवा १० हजार पी.पी.एम. १० मि.. प्रति १० लीटर पाणी या प्रमाणात सुरवातीच्या वाढीच्या अवस्थेत फवारावे. प्रादुर्भाव दिसू लागताच जैविक कीटकनाशक मेटारायझियम (नोमुरिया) रीलेई किंवा मेटारायझियम अनिसोपली ५० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून सकाळी लवकर अथवा दुपारी चारनंतर फवारणी करावी. ट्रायकोग्रामा बॅक्टरी (ट्रायको कार्ड) १.५ लाख अंडी हेक्टरी सोडावेत.

रासायनिक पद्धत : थायमेथोझ्याम १२.६ टक्के सी.जी. प्लस लॅबडा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के झेड.सी. २.५ मिली किंवा स्पिनोटोरॅम ११.७ टक्के एस.सी. ५ मिली किंवा क्लोरोनट्रॅनीलप्रोल १८.५ टक्के एस.सी. ४ मिली या कीटकनाशकांची आलटून पालटून गरजेप्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

army worm on maize
Nashik Agriculture News : कांदा, कपाशी, मका या ‘क’ फॅक्टरवरच मदार; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे नियोजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.