Nashik News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महापालिकेकडून अर्ज भरण्यासाठी सहा विभागीय कार्यालयांमध्ये तसेच महापालिकेच्या कर संकलन केंद्रांवर व अंगणवाडी केंद्रांमध्ये ३६ ठिकाणी व्यवस्था करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विकास विभागाच्या वतीने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. (Ladki Bahin Yojana)
योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सोनिक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. यात महापालिकेला योजना अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.
जनतेपर्यंत योजनेची माहिती व प्रचार प्रसार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त श्रीकांत पवार, महापालिकेचे खाते प्रमुख, विभागीय अधिकारी, सर्व विभागातील मुख्य अंगणवाडी सेविका उपस्थित होते. (latest marathi news)
महापालिकेकडून योजनेसाठी सहा विभागीय कार्यालयांचे कर संकलन केंद्र व अंगणवाडी केंद्र असे एकूण ३६ ठिकाणी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
योजनेचे अर्ज महापालिकेकडून विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घेण्याचे आवाहन महिला व बालकल्याण विभागाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.