Nashik Crime News: कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणास अटक; 12 तासांच्या आत पोलिसांनी संशयिताच्या आवळल्या मुसक्या

Nashik Crime : कोयता घेऊन नागरिकांमध्ये दहशत माजवणाऱ्यांच्या अवघ्या बारा तासांच्या आत मुस्क्या आवळण्यात सातपूर पोलिसांना यश आले.
Police escorting suspects in Sadguru Nagar area.
Police escorting suspects in Sadguru Nagar area.esakal
Updated on

सातपूर : येथील सद्गुरूनगर परिसरात शनिवारी (ता. २१) रात्री हातात कोयता घेऊन नागरिकांमध्ये दहशत माजवणाऱ्यांच्या अवघ्या बारा तासांच्या आत मुस्क्या आवळण्यात सातपूर पोलिसांना यश आले. संशयितांमध्ये २१ वर्षीय तरुणासह चार अल्पवयीन संशयितांचा समावेश आहे. दरम्यान, रविवारी (ता. २२) ज्या परिसरात घटना घडली, त्या परिसरात त्यांची धिंड काढण्यात आली. सद्गुरुनगर परिसरात शनिवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास सहा ते सात टवाळखोरांनी तरुणाला मारण्याच्या हेतूने येथील अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला होता. ( Arrested youth who was terrorizing with Koita by police )

मात्र तो तरुण मिळून न आल्याने त्यांनी हातात कोयते नाचवत अपार्टमेंटमधील घरांच्या काचा फोडत दहशत मजवत सातपूर पोलिसांना खुले आव्हान दिले.दरम्यान, सातपूर पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान करत संशयितांचा शोध सुरू केला. या वेळी गस्तीवर असलेल्या पोलिस अंमलदार सागर गुंजाळ व भूषण शेजवळ यांना संशयिताची गोपनीय माहिती मिळाली असता त्यांनी आनंदवल्ली परिसरात सापळा रचला. या वेळी संशयित कोयता गँग आनंदवल्ली परिसरात येताच सातपूर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.

यात महेश सोनवणे (वय २१, रा. कामगारनगर) यांच्यासह चार अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले. दरम्यान, रविवारी ज्या ठिकाणी घरांच्या काचा फोडल्या. त्याच परिसरात त्यांची धिंड काढण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक राकेश न्याहाळदे, उपनिरीक्षक राहुल नळकांडे, सागर गुंजाळ, भूषण शेजवळ, दीपक खरपडे, अनिल आहेर आदींनी कामगिरी केली.

Police escorting suspects in Sadguru Nagar area.
Nashik Crime : माजी आमदार दराडेंची तोतयागिरी; गुन्हा दाखल

संशयितांची वरात

कामगारनगरमधील काठे हाउस परीसरात इमारतीत घुसून तलवार व कोयत्याने हल्ला करत इमारतीमधील घरांचे दरवाजे व खिडक्या फोडल्याबद्दल सातपूर पोलिसानी अंकुश दीपक निंबाळकर (वय १७), अरुण रामलू बंडी (१७), कार्तिक संतोष घोडेस्वार (१७), महेश गोकुळ सोनवणे (२१), समाधान काशीनाथ बेंडकुळे (१७, सर्व रा. कामगारनगर) या संशयितांना अटक करून सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात वरात काढण्यात आली.

Police escorting suspects in Sadguru Nagar area.
Nashik Crime : ओझरच्या दुर्गामाता मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.