Sant Nivruttinath Palkhi : संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

Nashik News : यंदा श्रीनिवृत्तिनाथ महाराज यांचे ७५१ वे जन्मोत्सवी वर्ष असून, या वर्षी आनंदाने सर्व ठिकाणी साजरे होत आहे.
Sant nivruttinath Maharaj Palkhi in Solapur
Sant nivruttinath Maharaj Palkhi in Solapuresakal
Updated on

Nashik News : यंदा श्रीनिवृत्तिनाथ महाराज यांचे ७५१ वे जन्मोत्सवी वर्ष असून, या वर्षी आनंदाने सर्व ठिकाणी साजरे होत आहे. संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात ५२ दिंड्यांत वारकऱ्यांची लाखभर उपस्थिती आहे. मंगळवारी (ता. ९)) संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तिनाथ महाराज पायी पालखी सोहळ्याचे अहिल्यानगर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात दुपारी एकला आगमन झाले. (Sant nivruttinath Maharaj Palkhi in Solapur)

या वेळी श्रीनिवृत्तिनाथांच्या पादुका पालखी सोहळा महाराष्ट्रातील १२ पैकी एक प्रतिजेजुरी मल्हारी मार्तंड खंडेराव महाराज मंदिराजवळ आल्यानंतर संपूर्ण वारकरी हे भंडाऱ्याची उधळण करतात. या स्थळी प्रतिजेजुरीचे भंडार नयनरम्य दृश्य साकारले जाते. नाशिक येथील शिवजयंती महोत्सव समिती, नाशिक रोड येथील अनेक युवा वारकरी उपस्थित होते.

सोहळ्यात पालखी सोहळ्यातील सर्व मानकरी, दिंडीवाले, पताका, झेंडेकरी, नगारावाले, वारकरी व बैलजोडीचे मालक, अश्वाचे मानकरी व परिसरातील गावकरी दर्शनासाठी असंख्य मंडळी आवर्जून उपस्थित होते. या वेळी सोहळ्याचे मानकरी मोहन महाराज बेलापूर, जयंत महाराज गोसावी, बाळकृष्ण महाराज डावरे.

निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थान अध्यक्ष कांचनताई जगताप, सचिव अमर ठोंबरे, सोहळाप्रमुख नारायण मुठाळ, विश्वस्त माधवदास राठी, श्रीपाद कुलकर्णी, माजी अध्यक्ष नीलेश गाढवे, अनिल गोसावी, विश्वस्त व प्रसिद्धीप्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे, केशव पोरजे आदी उपस्थित होते. रामकृष्णदास महाराज लहवितकर व चोपदार सागर महाराज (दौंड), संस्थानचे विणेकरी कृष्णा रायते, पुंडलिक थेटे, राजेंद्र फोकने. (latest marathi news)

Sant nivruttinath Maharaj Palkhi in Solapur
Nashik News : खळबळजनक! प्रेमसंबंधातून महिलेने घेतली मनगटाची नस कापून; सातपूर पोलिसांनी केले रुग्णालयात दाखल

नितीन खर्जुल आदींनी सहकार्य केले. मुक्कामी रावगाव (तालुका करमाळा) येथे ग्रामस्थांच्या वतीने पालखीवर जेसीबीतून पुष्पवृष्टी करून अत्यंत देखणे संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तिनाथ महाराज पालखीचे स्वागत करण्यात आले. करमाळा तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद घुगे यांचा संस्थानच्या वतीने सन्मान करण्यात आला.

पोलिस उपनिरीक्षक माहूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. या वेळी सोलापूर जिल्ह्यात वारकऱ्यांची अत्यंत चोख व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे. शिस्तबद्ध चाललेला हा सोहळा पंढरपूरच्या दिशेने बुधवारी (ता.१०) सकाळी करमाळामार्गे जेऊर रवाना होईल, अशी माहिती संस्थानचे प्रसिद्धीप्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे यांनी दिली.

Sant nivruttinath Maharaj Palkhi in Solapur
Nashik Civil Hospital : पंचनामा न होताच मृतदेह रात्रभर शवविच्छेदन कक्षाबाहेर! ‘सिव्हिल’चा भोंगळ कारभार पुन्हा उघड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.