Nashik News : नांदगावला बायपास हाच पर्याय! महामार्गावरील वाहतूक दहापटीने वाढली

Nashik News : मालेगाव, येवला, मनमाड, चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर या पाच शहरांना जोडणारा मुख्य महामार्ग नांदगांव शहरातुन जातो.
Pedestrians and school girls have to make their way through Nandgaon city in heavy vehicles.
Pedestrians and school girls have to make their way through Nandgaon city in heavy vehicles.esakal
Updated on

अरुण हिंगमिरे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मालेगाव, येवला, मनमाड, चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर या पाच शहरांना जोडणारा मुख्य महामार्ग नांदगांव शहरातुन जातो. गेल्या दहा -पंधरा वर्षात या मार्गाने जाणाऱ्या अवजड वाहनांची संख्या दहापटीने वाढल्याने हा महामार्ग वाहतुकीसाठी तोकडा पडून लागल्याने त्यांचे रूंदीकरण अथवा पर्यायी बायपास हे दोनच मार्ग सध्या येथील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यास उपलब्ध आहेत. (bypassing Nandgaon is only option to control traffic)

रूंदीकरणापेक्षा पर्यायी बायपास हाच यावर उत्तम पर्याय आहे. गेल्या तीस वर्षांपूर्वी बायपाससाठी सर्वेक्षणही झालेले आहे मात्र त्यावर पुढे काहीही हालचाल झालेली नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल. महामार्ग शहरातून जात असल्याने साहजिकच कृषी उत्पन्न बाजार समिती, बसस्थानक, पोलिस ठाणे, शासकीय विश्रामगृह, स्टेट बँकेसह इतर बॅंका.

रेल्वे स्टेशन, पेट्रोल पंप तसेच राजकीय पक्षांची कार्यालये यामुळे या महामार्गावर सतत वर्दळ असते. सर्वात महत्वाचे म्हणजे या रस्त्यालगतच येथील मुख्य व्यापारपेठेत येण्याजाण्याचा रस्ता, दोन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये, वन विभागाचे कार्यालय यामुळे सर्वसामान्य जनतेचे विविध कामांसाठी नियमित जाणे येणे असते. विद्यार्थ्यांना दररोज याच रस्त्याने जावे लागते.

पाच शहरांना जोडणारा मुख्य रस्ता हा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणाहून गेला आहे, मात्र तो अरूंद असल्याने नांदगाव शहरात वारंवार वाहतुकीची कोंडी होत असते. यात आवजड वाहनांचे प्रमाण अधिक असते. या वाहतूक कोंडीमुळे शहरात ध्वनी, वायू प्रदुषणासोबत अपघातही होत असतात. अनेक वाहने नांदगाव शहरातून जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा लावलेली असतात, त्यामुळे वाहतूक कोंडीत भरच पडते. (latest marathi news)

Pedestrians and school girls have to make their way through Nandgaon city in heavy vehicles.
Nashik YCMOU News : ‘मुक्‍त’च्‍या एमबीए, बीसीएची सीईटी अर्जाची 13 पर्यंत मुदत

सकाळी व सायंकाळी शाळेच्या वेळेत मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी नेहमीचीच झाली आहे. त्यामुळे पादचारी, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक, महिलांना रस्ता ओलांडताना जिवावर बेतण्याची शक्यता असते. यापूर्वी याच मार्गावर शालेय विद्यार्थी व पादचारींना अपघातात प्राण गमवावे लागले.

त्यामुळे शहरातील रस्ता रुंदीकरण करणे गरजेचे आहे. मालेगाव, येवला, मनमाड, चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर या पाच शहरांना जोडणारा प्रमुख मार्ग हा नांदगाव शहराच्या बाहेरून बायपास रस्त्याची निर्मिती करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. शिवाय नित्याची होणारी वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार नाही व मार्ग देखील निघणार नाही.

Pedestrians and school girls have to make their way through Nandgaon city in heavy vehicles.
Nashik News : मध्यप्रदेश सरकारकडून सीमेवरील नाके बंद!

तीस वर्षांपूर्वीच सर्वेक्षण

नांदगावात १९९० च्या दशकात शहराच्या बाहेरून वळण रस्ता करण्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात आले होते. हे सर्वेक्षण शहराच्या चारही बाजूंनी झाले होते आणि त्यावेळी झालेल्या सर्व्हेक्षणाप्रमाणे बायपास रस्ता होऊन शहराचा विस्तार व विकास झपाट्याने झाला असता. येथील एका बड्या हस्तीच्या काही वैयक्तिक स्थावर मालमत्तेमधून नियोजित रस्ता जाणार होता.

म्हणून हा रस्ता होऊ नये, यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. रस्त्याच्या सर्व्हे झालेल्या नियोजित कामावर पांघरूण घालण्यास आणि गुंडाळण्यात यशस्वी झाल्याने येथील बायपास रस्त्याचे काम आणि शहराचा विकास विस्तार रखडला, निदान आतातरी त्या कामाला गती यावी अशी अपेक्षा शहरवासीय बाळगून आहेत.

Pedestrians and school girls have to make their way through Nandgaon city in heavy vehicles.
Nashik Junior Collage Admission : पहिल्‍या फेरीत 6 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश; दुसऱ्या फेरीची उद्यापासून प्रक्रिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.