नाशिक : शेतकऱ्यांची आर्थिक वाहिनी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची वसुली ठप्प झाल्याने बॅंक आर्थिक अडचणीत सापडली आहे. यातच ठेवीदारांच्या ठेवी मिळत नसल्याने ठेवीदार, तर पीककर्ज मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक आहेत. सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी नाराज आहेत. याचे पडसाद गुरुवारी (ता. २६) जिल्हा बॅंकेच्या होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उमटण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेची ७० वी वार्षिक सभा गुरुवारी सकाळी अकराला बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात होणार आहे. ()
कोट्यवधींची वसुली होत नसल्याने जिल्हा बॅंक आर्थिक अडचणीत सापडली आहे. बॅंकेच्या सक्तीविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. परिणामी, जिल्हा बॅंकेची वसुली पूर्णपणे ठप्प झाली आहे. मार्च २०२४ अखेर केवळ १६.६८ टक्के वसुली झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात तीन टक्क्यांनी झालेली वाढ, निफाड ड्रायपोर्टपोटी मिळालेले १०५ कोटी अन् बॅंकेचा कमी झालेला तोटा हाच वर्षभरातील काहीसा दिलासा.
वसुलीवर भर देण्याचे जाहीर केले जाते. प्रत्यक्षात बॅंक प्रशासनाकडून वसुली होत नसल्याने ठेवीदार ठेवींसाठी बॅंकेत येतात, वर्षभरात अनेक ठेवीदारांनी आंदोलने केली. बॅंकेचा परवाना धोक्यात सापडल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बॅंकेला सावरण्यासाठी बैठका घेत अॅक्शन प्लॅन बनविला, तसेच बुलडाणा जिल्हा बॅंकेच्या धर्तीवर मदतीचा ७०० कोटींचा प्रस्ताव तयार असून, तो शासनदरबारी पडून आहे. (latest marathi news)
मात्र, त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. वेतनासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन झाले. त्यामुळे बॅंक प्रशासनाविरोधात शेतकरी, ठेवीदार, कंत्राटी कर्मचारी यांचा रोष वाढत चालला आहे. या रोषाचा सामना कर्मचारी व अधिकारी वर्गाला करावा लागत आहे. या मुद्द्यांवर सभेत, सभासद, ठेवीदार, कर्मचारी आक्रमक होण्याची शक्यता आहे.
सभेचे विषय
बँकेच्या वसुलीसाठी दोन सामोपचार कर्ज परतफेड योजनेस ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देणे हा विषय सभेवर ठेवण्यात आला आहे. बँकेशी संलग्न सर्व बिगरशेती सहकारी संस्था व लघुउद्योजकाकडील थकीत/एनपीए झालेल्या कर्जाच्या वसुलीसाठी सामोपचार कर्ज परतफेड योजनेस ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देणे याबाबतचाही विषय सभेवर आहे.
सभासदांच्या प्रतिनिधींची निवडणूक
वार्षिक सभेपूर्वी याच दिवशी व ठिकाणी सकाळी दहाला बँकेच्या वैयक्तिक सभासदांच्या प्रतिनिधींची निवडणूक घेण्यात येणार आहे. सभासद तालुक्यातील प्रतिनिधींची नावे सुचवतील. बँकेच्या वैयक्तिक सभासदांतर्फे मतदानाचा हक्क बजावण्याकरिता सभासदांच्या प्रतिनिधींची निवडणूक होणार असल्याचे जिल्हा बँकेने कळविले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.