Nashik News : मालेगावी पार्किंगच नाही, वाहने लावणार कुठे? चौकाचौकात कोंडी

Nashik : शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस भेडसावत आहे. येथे चौकाचौकात तसेच वळणाच्या ठिकाणावर दुचाकी, चारचाकी वाहने उभी केलेली असतात.
Two-wheelers parked on both sides of the road leading to the old bus stand here.
Two-wheelers parked on both sides of the road leading to the old bus stand here.esaka
Updated on

Nashik News : शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस भेडसावत आहे. येथे चौकाचौकात तसेच वळणाच्या ठिकाणावर दुचाकी, चारचाकी वाहने उभी केलेली असतात. अधिकृत पार्किंग व्यवस्था नसल्याने दुचाकी चालकांना नाईलाजास्तव वाहने रस्त्याच्या कडेला लावावी लागतात. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते. शुक्रवारी वाहतूक कोंडीत मोठी भर पडते. (nashik no official parking system for two wheeler in malegaon marathi news)

महापालिकेने पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. येथील वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांनी अनेक वेळा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. तरीही येथील परिस्थिती जैसेथे होत आहे. ठिकठिकाणी दुचाकी रस्त्याच्या कडेला लावलेल्या दिसत आहेत.

जुना आग्रा रस्ता, मोसम पुल, टेहरे चौफुली, आरबीएच शाळेजवळ यासह विविध भागातील रस्त्यांचे काम सुरु असल्याने एकेरी वाहने धावतात. त्यामुळे रस्त्याच्या कडेला वाहने उभी असल्याने वाहतूक कोंडी होते. शहरात वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. पोलिस प्रशासनाने वाहतूक पोलिसांच्या संख्येत वाढ करावी. (latest marathi news)

Two-wheelers parked on both sides of the road leading to the old bus stand here.
Nashik News : चांदीवाल अहवाल सरकारने पटलावर मांडावा : माजी गृहमंत्री देशमुख

जेणेकरुन येथील वाहतूक कोंडीची समस्या कायमची सुटेल. महापालिका प्रशासनाने बाजाराच्या ठिकाणी मोकळ्या जागेवर शुल्क आकारुन वाहनतळी सुरु करावीत. शहरात हिंदू- मुस्लीम बांधवांचे वर्षभर विविध सण, उत्सव असतात. येथे वाहनतळी सुरु झाल्यास कायमचा प्रश्‍न सुटेल.

या भागात वर्दळ

येथील नवीन बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कुसुंबा रोड, सुपर मार्केट, पिवळा पंप, महाराष्ट्र सायजिंग, देवीचा मळा, एकबाल डाबी, गांधी मार्केट, मोसम पुल, सटाणा नाका, सोमवार बाजार, अंजुमन चौक, भिकू चौक, सरदार मार्केट, मोहम्मद अली रोड, किदवाई रोड, करीम नाका, स्टेट बँक चौक, रॉयल हब संकुल आदी भागांमध्ये वाहनांची वर्दळ असते.

''नागरीकांनी वाहने रस्त्यावर लावू नयेत. वाहने रस्त्यावर लावल्यास वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. रहदारीची समस्या उद्‌भवते. त्यामुळे अपघात होतात. पोलिसांनी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करावी.''- जितेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते, कलेक्टर पट्टा, मालेगाव

Two-wheelers parked on both sides of the road leading to the old bus stand here.
Nashik News : राज्यातील पहिले पॉटरी क्लस्टर ममदापूरला! कुंभार कारागिरांना प्रशिक्षण सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.