Tobacco Addiction : युवा पिढीला व्यसनांपासून परावृत्त करण्याचे आव्हान : आशिमा मित्तल

Nashik News : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण उपक्रमाच्या माध्यमातून शाळा-महाविद्यालयांत जास्तीत जास्त उपक्रम राबविण्यात यावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.
Nashik Chief Executive Officer of Zilla Parishad, Ashima Mittal, on anti-tobacco awareness in the district hospital.
Nashik Chief Executive Officer of Zilla Parishad, Ashima Mittal, on anti-tobacco awareness in the district hospital.esakal
Updated on

Nashik News : युवा पिढीला तंबाखूजन्य उत्पादनापासून परावृत्त करण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण उपक्रमाच्या माध्यमातून शाळा-महाविद्यालयांत जास्तीत जास्त उपक्रम राबविण्यात यावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले. (Ashima Mittal statement challenges of dissuading young generation from addictions)

जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण उपक्रमांतर्गत जनजागृतीपर कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती मित्तल बोलत होत्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे उपस्थित होते. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा सल्लागार डॉ. शिल्पा बांगर यांनी प्रास्ताविक केले.

डॉ. शिंदे म्हणाले, की युवा पिढीला आकर्षित करण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून वेगवेगळे उपाय केले जातात. अभिनेत्यांकडून जाहिराती केल्याने युवा वर्गात त्याचे आकर्षण वाढते; परंतु युवा पिढी अशा जाहिरातींना बळी पडून व्यसनाधीन होऊन त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात. (latest marathi news)

Nashik Chief Executive Officer of Zilla Parishad, Ashima Mittal, on anti-tobacco awareness in the district hospital.
Nashik News : 'स्वाभिमानी शेतकरी'चा बारामतीतून एल्गार!

अनेकांना कर्करोगाच्या दुर्धर आजाराला सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी नावीन्यपूर्ण लोकनृत्य सादर करून तंबाखूचा निषेध दर्शविला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी कोटपा कायद्याची अंमलबजावणीसंदर्भात मार्गदर्शन केले.

आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्राचे प्राचार्य डॉ. सागर अन्सार यांनीही आदिवासी भागात लहान मुले खूप कमी वयात या व्यसनाच्या आहारी जात असल्याचे सांगितले. कविता पवार यांनी सूत्रसंचालन केले. उज्ज्वला पाटील यांनी आभार मानले.

Nashik Chief Executive Officer of Zilla Parishad, Ashima Mittal, on anti-tobacco awareness in the district hospital.
Nashik Police Station : शहरातील वर्दळीतल्या ‘पोलिस चौक्या’ नावालाच! बंद चौक्यामुळे तक्रारदारांची गैरसोय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.