सातपूर : अशोकनगर येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी बनवण्यात आलेले विरंगुळा केंद्र धुळखात पडले आहे. सदर वास्तू उभारण्यासाठी नाशिक मनपाने १० लाख रुपये निधी खर्च केला. मात्र वापराअभावी हे विरंगुळा केंद्र बंद असून हा निधी पाण्यात गेल्याचे बोलले जात आहे. या केंद्राचा वापर होत नसल्याने या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य तयार झाले आहे. (Ashoknagar Virangula center in dust)