Nashik News : राष्ट्रवादीच्या विधानसभा समन्वयकांची आज बैठक; प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा 2 दिवसांचा जिल्हा दौरा

Nashik : सुनील तटकरे नाशिक दौऱ्यावर येत असून, २८ व २९ जुलैला येवला, निफाड, सिन्नर, दिंडोरी येथे बैठका घेणार आहेत
Sunil Tatkare
Sunil Tatkare Newsesakal
Updated on

Nashik News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नाशिक दौऱ्यावर येत असून, २८ व २९ जुलैला येवला, निफाड, सिन्नर, दिंडोरी येथे बैठका घेणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. गेल्या आठवड्यात शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले होते. (Assembly coordinators meeting of NCP today in niphad )

राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार असलेल्या निफाड तालुक्यात त्यांनी याचा कार्यक्रमाला हजेरी लावली. चांदवड येथे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल यांच्या वाढदिवसानिमित्त हजेरी लावली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून शहरातील देवळाली, पूर्व, पश्चिम व मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने शनिवारी (ता. २७) भाजपचे नाशिक जिल्हा प्रभारी व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या अनुषंगाने नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार तटकरे यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (latest marathi news)

Sunil Tatkare
Nashik News : विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागा : रवींद्र मिर्लेकर यांचे बूथ प्रमुखांना आवाहन

असा आहे नियोजित कार्यक्रम

रविवारी (ता. २८) सकाळी अकराला नाशिक येथे आगमन. दुपारी बारापर्यंत नाशिक शहर व जिल्हा कार्यकारिणी व प्रमुखांसमवेत बैठक. दुपारी साडेबाराला देवळाली विधानसभा मतदारसंघाचा आढावा, आमदार सरोज अहिरे व विधानसभा समन्वयकांची ते बैठक घेतली. दुपारी दोनला सिन्नर येथे आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासमवेत विधानसभा समन्वयकांची बैठक होईल. दुपारी तीनला कोपरगावकडे प्रयाण करतील.

कोपरगाव येथे आमदार आशुतोष काळे यांच्यासमवेत विधानसभा समन्वयकांची बैठक होईल. सायंकाळी सहा ते सात यादरम्यान येवला विधानसभा मतदारसंघात राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ व विधानसभा समन्वयकांची बैठक होईल. सोमवारी (ता. २९) सकाळी दहा ते अकरा यादरम्यान निफाड येथे आमदार दिलीप बनकर यांच्यासमवेत विधानसभा समन्वयकांची बैठक होईल. सकाळी अकरा ते दुपारी साडेबारादरम्यान दिंडोरी येथे आमदार नरहरी झिरवाळ व विधानसभा समन्वयकांची बैठक होईल.

Sunil Tatkare
Nashik News : अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यात धान्य वितरण ठप्प; फोर जी पॉस मशीन्सला सर्वर डाऊनचा फटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.