नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या निकालात कोण बाजी मारणार याचा फैसला शनिवारी (ता. २३) होणार आहे. जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांत सकाळी आठपासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासन सज्ज झाले असून, शनिवारी दुपारपर्यंत अंतिम निकाल घोषित होतील, असा अंदाज जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी यंदा विक्रमी ६९.१२ टक्के मतदान झाले.