नाशिक : इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन अर्थात ‘ईव्हीएम’विषयी मतदारांच्या मनात शंका निर्माण झालेली असताना जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी १३ बॅलेट युनिट, १२ कंट्रोल युनिट आणि ३७ व्हीव्हीपॅट बदलण्यात आले. त्यामुळे मतदारांना काही वेळ वाट पाहावी लागल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही मिनिटांत अतिरिक्त यंत्रांचा वापर केल्याने मतदान सुरळीतपणे पार पडल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.